Onion market Rate : कांदा बाजारभावाने गाठला ४ हजाराचा आकडा..

Onion market Rate

Onion market Rate : गुरूवारी दिनांक १३ फेब्रुवारी रोजी राज्यात एक लाख ७८ हजार क्विंटल कांदा आवक झाली. सद्या तरी कांदा आवक घटलेली दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कांदयाचे बाजारभाव २ हजाराच्या पुढे आहेत. सोलापूर, लासलगाव या ठिकाणी कांदा बाजारभाव जास्तीत जास्त ४ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.

सध्या मागणी आणि पुरवठा याचे गणित टिकून आहे, तसेच निर्यातही चांगली सुरू आहे. त्यात अजूनही उन्हाळी कांदा बाजारात आलेला नसल्याने बाजारभाव टिकून राहिले असून काही दिवस वाढत जाणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान नाशिक बाजारसमितीत उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली असून काल उन्हाळी कांद्याची १५९५ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव १४०० रुपये, जास्तीत जास्त ३५०० रुपये आणि सरासरी २६५० रुपये प्रति क्विंटल होते.

गुरुवारी लासलगाव बाजारात कांद्याने बऱ्यापैकी उसळी घेतली. या ठिकाणी लाल कांद्याची १७ हजार २० क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव १२००, जास्तीत जास्त ३४०० आणि सरासरी २९०० रुपये असे राहिले. लासलगावच्या निफाड उपबाजारात लाल कांद्याची सुमारे ६ हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त बाजारभाव ४ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. कमीत कमी १३११ आणि सरासरी ३ हजार रुपये प्रति क्विंटल असे होते. विंचूर बाजारातही सरासरी २९०० रुपये बाजारभाव आहेत.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत पोळ कांद्याला २८५० रुपये बाजारभाव सरासरी मिळाला. पुणे बाजारसमितीत सरासरी २२५० रुपये प्रति क्विंटल, सांगली बाजारात २२०० रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजारात २ हजार रुपये सरासरी प्रति क्विंटल, तर नारायणगाव बाजारात २५०० रुपये सरासरी प्रति क्विंटल आणि नगर बाजारात २४०० रुपये सरासरी प्रति क्विंटल बाजारभाव मिळाल्याने दिसून आले.

Leave a Reply