गावागावात गुलाल उधळणार; 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगाकडून मतदानाची तारीख जाहीर !

गावागावात गुलाल उधळणार; 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगाकडून मतदानाची तारीख जाहीर !

राज्यभरातील सुमारे 2359 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2हजार 950 सदस्य पदांच्या तर 130 सरपंचाच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुका ंसाठी पाच नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे.  अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी केली आहे.

मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार ,संबंधित ग्रामपंचायतच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून नामनिर्देशन पत्रे 16 ते 20 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत दाखल करण्यात येतील.  नामनिर्देशन पत्राची छाननी 23 ऑक्टोंबर 2023 रोजी होईल.  नाम निर्देशन पत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येतील.  त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचे देखील वाटप होणार आहे.

मतदान आणि मतमोजणी कधी ? 

5 नोव्हेंबर 2023  रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये मतदान होईल . तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी ही सहा नोव्हेंबर रोजी करण्यात येईल . परंतु गडचिरोली व गोंदिया नक्षलग्रस्त भागांमध्ये सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असून गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागामध्ये ७ नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी केली जाईल.

पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका का रखडल्या? 

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मार्ग मोकळं झाला.  परंतु त्यापूर्वी 92 नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या,  त्यामुळे त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता.  जाहीर झालेल्या नगर परिषद तेच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली.  त्याचप्रमाणे शिंदे सरकारने मविआ  काळात तयार करण्यात आलेली वॉर्डरचना  बदलण्याचा निर्णय घेतला होता. या नव्या  वार्ड रचनेलाही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आले त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या.

ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेली ही ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे.  राज्य मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी आधी दरवेळी महत्त्वाच्या शहरांमधील महानगरपालिका निवडणुका पार पडतात.  पण यावेळी महानगरपालिका निवडणूक प्रलंबित आहे.  महापालिका निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुका मानले जाते . पण राज्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडत असल्यामुळे जनतेचा कल नेमका कोणाच्या बाजूने आहे हे या निवडणुकांमधून स्पष्ट होण्याची शक्यता असते.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गटामध्ये हालचाली वाढल्या आहेत.  प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे.  देश पातळीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे.  भाजपच्या गटात दररोज बैठकांचे सत्र सुरू असून विरोधी पक्षाच्या आघाडीने ही भाजप विरोधात कंबर कसली आहे . त्यामुळे येत्या काळात काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *