पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अटी पूर्ण कराव्या लागतात. पीएम किसान योजनेचा हप्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे किती महत्त्वाचे आहे . प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात.
हे पैसे 2-2 हजार रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात वर्षातून तीन वेळा दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अटी पूर्ण कराव्या लागतात. पीएम किसान योजनेचा हप्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे किती महत्त्वाचे आहे व ई केवायसी कुठे करावे? हि सर्व माहिती या लेखामधून जाणून घेऊया
जाणून घ्या ई-केवायसी करणे किती महत्त्वाचे आहे?
या योजनेशी संबंधित सर्व शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य असल्याचे सरकारने आधीच स्पष्ट केले होते. तुम्ही योजनेत नव्याने सामील झाला आहात किंवा आधीच लाभ घेत आहात. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही किंवा ते पूर्ण केले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.
जाणून घ्या तुम्ही ई-केवायसी कुठे करून घेऊ शकता ?
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर तुम्ही ते तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रातून करून घेऊ शकता. येथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड द्यावे लागेल, त्यानंतर तुमचे ई-केवायसी केले जाईल. किंवा, तुम्ही अधिकृत वेबसाईट पीएम किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/वर जाऊन ई-केवायसी देखील करू शकता.
या करणा मुळे पुढील हप्ता अडकू शकतो ?
ई-केवायसी व्यतिरिक्त, तुमचा आगामी हप्ता इतर कारणांमुळे सुद्धा अडकू शकतो. तुम्ही भरलेल्या अर्जात कोणतीही चूक होणार नाही याचा कडे लक्ष द्यावे लागेल. जसे कि- लिंगाची चूक, नावाची चूक, चुकीचा आधार क्रमांक किंवा चुकीचा पत्ता इ . मध्ये चूक झाली तर. तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता.अशा परिस्थितीत योजनेची नोंदणी करताना दिलेली माहिती तपासा.
येथे संपर्क करा :
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता.