वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार मध्ये डाळिंबासह सफरचंद, कोथिंबीर, पपई, करवंदाचा, पावसाळी हंगाम सुरू झालेला आहे. डाळिंब उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना जूनमध्ये पाऊस झाल्यानंतर जुलैमध्ये डाळिंबाचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता असते.
सध्या बाजारात फक्त डाळिंबाच्या दोन ते तीन गाड्या दाखल होत असून डाळिंबाच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. घाऊक बाजारामध्ये 120 ते 180 रुपये किलोने मिळणारे डाळिंब आता 250 ते 300 रुपये किलोने विकले जात आहे. जुलै महिन्यामध्ये एपीएमसी मार्केटमध्ये डाळिंबाचा हंगाम सुरू होतो .
ऑगस्टमध्ये डाळिंबाची आवक सुरू होते. यानंतर डाळिंबाचा हंगाम सुरू होत असतो. राज्यातील डाळिंब नगर, सोलापूर, सांगली पुणे, नाशिक, तसेच गुजरात राज्यस्थान येथून आयात केली जातात. दोन हंगामात डाळिंबाची लागवड केली जाते.
परंतु हा मुख्य हंगाम आहे सर्व शेतकरी आता पावसाचे प्रतीक्षा मध्ये आहे . उन्हामुळे डाळिंबाला तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. तेल्या रोगामुळे डाळिंबावर काळा डाग तयार होतो, अशा परिस्थितीत शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते जूनमध्ये पाऊस झाल्यास डाळिंबाचा हंगाम चांगला होईल,