बिपरजॉय’ची आज सायंकाळी जखाऊ बंदराला धडक, गुजरातला आज वादळी तडाखा!

बिपरजॉय’ची आज सायंकाळी जखाऊ बंदराला धडक,

आजवरच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ  टिकलेले हे चक्रीवादळ आहे. गुरुवारी संध्याकाळी गुजरात मधील कच्छ तालुक्यातील जखाऊ बंदराला सुमारे चारच्या नंतर धडकणार आहे .

या वादळाचा थेट तडाखा कच्छसह  देवभूमी, पोरबंदर ,द्वाराका व राजकोट या भागांना बसणार असून, किनारपट्टी लगतच्या जवळपास च्या भागावरील 50 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे .हे वादळ अरबी समुद्रातून नैऋत्यकडे घोंघावत निघल्यामुळे या वादळामुळे ठाणे ,मुंबई पालघर या महाराष्ट्रातील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ हे ईशान्य अरबी समुद्रात कडून वेगाने गुजरात कडे सरकत होते. मात्र वादळाने आपला वेग काहीसा कमी करून दिशा बदललेली असून ते आता नैऋत्येकडे सरकत गुरुवारी सायंकाळी चार ते रात्री आठच्या सुमारास कच्छ सौराष्ट्र या भागात धडकेल अशी माहिती हवामान संचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी दिली . वाऱ्याचा वेग हा दीडशे किलोमीटर जाईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला .

या वादळामुळे गुजरात सरकारने किनारपट्टी लगत राहणाऱ्या पन्नास हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलेले आहे . वादळाच्या वाटेमध्ये येणारे जाहिरात फलके हटवण्यात आलेले आहे .आकाशवाणी केंद्राचा 90 मीटर उंच मनोराही  हटवण्यात आलेला आहे . तसेच किनारपट्टी , वादळाचा तडाखा बसणाऱ्या भागांत  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या एनडीआरएफ च्या 18 तुकड्या राज्या पती प्रतिसाद दलाच्या बारा तुकड्यांसह रस्ते पाणी वीज आणि आपत्ती व्यवस्थापन भागाचे अनेक तुकड्या तैनात करण्यात आलेले आहेत.

मुंबई सह पालघर ठाणे येथे वादळी वाऱ्या ची शक्यता :-

गेल्या दोन दिवसापासून मुंबई, नवी मुंबई येथील वेगाने वारे वाहत आहेत ,नवी दिल्ली, ठाणे परिसरात रात्री जोरदार पावसाने हजेरी लावलेली होती. बुधवारी देखील नवी मुंबईमध्ये सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली .मात्र हा पूर्व मोसमी पाऊस असून बिपरजॉयचा मिश्र परिणाम असल्याचे  हवामान विभागाने सांगितले आहे .चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागात जाणवण्याची शक्यता असल्यामुळे एनडीआरएफच्या १४ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहे.  यापैकी पाच तुकडय़ा मुंबईमध्ये असतील तसेच त्या तुकडय़ा मध्ये 35 ते 40 जवान आहेत. 

मोसमी पावसाला पूरक :_- 

या चक्रीवादळाचा प्रभाव हा 18 जून पर्यंत राहील याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.  18 ते 21 जून या दरम्यान मोसमी वारे वादळासह वाटचाल करून संपूर्ण दक्षिण भाग व्यापणार आहेत . चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच मोसमीवारांचा वेगळे वाढण्याची शक्यता आहे ,बिपरजॉय  चक्रीवादळ  ओमानच्या दिशेने गेले असते तर मोसमी वाऱ्याला अडथळा निर्माण झाला असता परंतु हे देशाच्या किनारपट्टीकडे सरकल्यामुळे देशाच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस होईल. असे हवामान खात्याने व्यक्त केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *