सध्या कापसाचा चांगला स्टॉक कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडे आहे. आतापर्यंत ३२.८५ लाख गाठींची सीसीआयने खरेदी केली आहे. ‘सीसीआय ने खरेदी केलेल्या कापसाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे बाजारभावापेक्षा ‘सीसीआय च्या कापसला चांगला भाव मिळत आहे. कस्तुरी कॉटन भारत या ब्रॅंडखाली ‘सीसीआय’ कापसाची विक्री करत आहे, ‘सीसीआय’चे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली.
सीसीआयने आतापर्यंत जवळपास ३२.८५ लाख कापसाची गाठी खरेदी केली आहे . त्यापैकी सीसीआयने २४ लाख गाठींची खरेदी एकट्या तेलंगणातच केली आहे. त्यानंतर २.४४ लाख गाठीची खरेदी महाराष्ट्रात झाली. तर १ लाख ३० हजार गाठी आंध्र प्रदेशामध्ये खरेदी करण्यात आल्या आणि १ लाख २७ हजार कापूस गाठी मध्य प्रदेशामध्ये खरेदी केल्या आहेत.
सीसीआयची कापूस खरेदी फेब्रुवारी महिन्यापासून कमी झाल्याचे गुप्ता यांनी सांगितले . सीसीआयला शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा बाजारभाव जास्त झाल्यानंतर कापूस विकएं थांबवले . त्यामुळे कापूस सीसीआयला मिळत कमी झाले . तरी पण सीसीआयची केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. सीसीआयची शेवटची खरेदी चार मार्च रोजी करण्यात आली होती. सरासरी ७५०० के ७८०० रुपयांच्या दरम्यान आता सध्या बाजारामध्ये कापसाला भाव मिळत आहे.
‘सीसीआय’चे अध्यक्ष म्हणाले..
– सध्या बाजारामध्ये कापसाच्या ८० हजार ते १ लाख गाठींच्या दरम्यान आवक आहे.
– देशामध्ये ८५ हजार गाठींच्या दरम्यान रोजचा वापर करण्यात येत आहे.
– सीसीआयने कापसाची विक्री ही कस्तुरी कॉटन भारत या ब्रँडखाली सुरू केली आहे.
– चांगल्या गुणवत्तेचा कापूस सीसीआयने खरेदी केला
– सीसीआयच्या कापूस गाठींची गुणवत्ता चांगली
– सीसीआयच्या बाजारभावापेक्षा कापूस गाठींना जास्त भाव
सीसीआयचा भाव महत्त्वाचा
देशातील उद्योग हे अडचणीत आल्याचे कारण सांगून कमी किमतीत कापसाची मागणी सीसीआयकडे करत असतात.याचा अनुभव देखील मागे खूप वेळेस आला आहे. परंतु या वर्षी कमी किंमतीमध्ये सीसीआय कापूस विक्री करण्याची शक्यता कमीच आहे. कारण सध्या सुतगिरण्या,जिनिंग, कापड उद्योग, यांना फायदा होत आहे. सीसीआयच्या कापसाची गुणवत्ता विशेष म्हणजे चांगली आहे. अभ्यासकांनी सांगितले की बाजारभावाला सीसीआयच्या कापसाचेही भाव जास्त असल्यामुळे आधार मिळणार आहे .
सीसीआयला कापूस विक्री थांबवण्यात आली कारण खुल्या बाजारामध्ये कापसाचे भाव हमीभावापेक्षा जास्त झाले होते. आतापर्यंत ५ लाख गाठी कापूस सीसीआयने विकला. बाजारभावापेक्षा या कापसाला जास्त भाव मिळाला.
– ललितकुमार गुप्ता, अध्यक्ष, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया












