आता रेशन दुकानातही मिळणार बँकिंग सेवा; राज्य सरकारचे आदेश

आता रेशन दुकानातही मिळणार बँकिंग सेवा; राज्य सरकारचे आदेश

राज्यामध्ये आता रेशनिंगच्या दुकानातूनही बँकेचे व्यवहार होऊ शकतील. काही खाजगी बँकांचे व्यवहार केंद्राच्या टपाल खात्यामार्फत चालणारे बँकिंग व्यवहार येथे करता येतील.

खेड्यामध्ये तसेच काही दुर्गम भागांमध्ये ज्या ठिकाणी बँका तसेच एटीएम ची सुविधा नसते अशा ठिकाणी रेशनिंग दुकान असते आता त्यांचाच उपयोग करून सरकारने या दुकानांमध्ये बँकिंग व्यवहार सुरू केलेले आहेत .यामुळे रेशनिंग दुकानदारांना देखील कमाई होऊ शकते.

रेशन दुकानातून बँकेचे व्यवहार

राज्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था ही मजबूत असल्यामुळे त्याचाच फायदा बँकेचे व्यवस्थेसाठी होऊ शकतो. शिधावाटप दुकानदारांना या व्यवसायाचा लाभ मिळू शकतो. राज्य सरकारने याबाबतचे आदेश आज जाहीर केले असून राष्ट्रीयकृत बॅंका , इंडियन पोस्ट पेमेंट बँक, व खाजगी बँकांच्या सुविधा राज्यातील सर्व शिधावाटप दुकानांमधून उपलब्ध होऊ शकतील .केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने यामध्ये पुढाकार घेतला आहे.

दुकानदारांनाच प्रशिक्षण देणार

दुकानदारांनाच बँकेचे प्रशिक्षण देणार असून बँकेचे प्रतिनिधी म्हणून त्यांचीच नियुक्ती करणे अपेक्षित आहे. शिधावाटप केंद्रात बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्यावर पैसे पाठवणे किंवा प्राप्त करणे विविध सुविधांचे पैसे प्राप्त करणे बिले भरणे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सर्व सुविधा तिथेच मिळून शकतील यासाठी केंद्र आणि संबंधित बँकेमध्ये करार होणे गरजेचे आहे. दुकानदारांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही सर्व पणे बँकेची असेल.

अशाही संधी उपलब्ध

दुकानदारांना विविध उत्पादने सेवांसाठी वाढीव महसूल मिळेल.

बँकांमार्फत विविध वित्तीय संस्थांच्या मार्फत ग्राहकांना कर्ज सुविधा मिळेल

डिजिटायझेशन व रोखविरहित माध्यमातून सर्व व्यवहार सुलभ.

दुकानातील क्रॉस सेलिंग ची शक्यता वाढेल.

दुकानदारांना बँकेची उत्पादने आणि सेवा वितरित करता येणार.

विक्री व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळेल.

Leave a Reply