सध्या शेतकरी पावसाची वाट बघत असून, शेतीसाठी बियाणे आणि खत खरेदी करत आहेत .हे खरेदी करत असताना शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. खरिपाच्या तोंडाला शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांना कृषी विभागाने चांगलाच दणका दिला आहे.
सातारा कृषी विभागाकडून 14 विक्रेत्यांना दणका देण्यात आलेला आहे. व त्यांचे परवाने देखील निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळेच कृषी सेवा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे .यामुळे विक्री करताना सुद्धा तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे .
याबाबत अशीच कारवाई सुरू राहील अशी माहिती सातारा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे खते आणि बियाणे विक्रीमध्ये बोगसपणा आढळल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी विभागीय स्तरावर भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
या पथकांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या त्यांची लूटमार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. या ठिकाणी 12 भरारी पथकांमार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू आहे.