भारत सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यात मदत करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. अशाच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी भारत सरकारच्या बँकांकडून कर्ज दिले जाते.
या योजनेनुसार SBI शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 80 टक्के पर्यंत कर्ज देते. म्हणजेच आता शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदी करताना ट्रॅक्टरचे एकूण किमतीच्या फक्त वीस टक्के रक्कम भरावी लागेल. व राहिलेली 80 टक्के रक्कम कर्जाची असेल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्जावरील व्याजही खूप कमी आहे. या योजनेचा लाभ फक्त भारतातील रहिवासीच घेऊ शकतात.
ट्रॅक्टरसाठी कोण कर्ज घेऊ शकतो?
ही योजना फक्त भारतामध्ये राहणाऱ्या लोकांसाठीच आहे. आणि ज्याचे दरवर्षी चे उत्पन्न सुमारे 10 लाख आहे. तेच ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात.जर तुमचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज मिळणार नाही. तसेच तुमच्याकडे किमान दोन एकर जमीन असणे आवश्यक आहे. जी जमीन लागवडीयोग्य असणे गरजेचे आहे .
कर्ज मिळवण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे हवीत. यामध्ये तुमचे आधार कार्ड, तुमच्या मालकीच्या जमिनीबद्दलची कागदपत्रे, तुम्ही त्या ठिकाणी राहत असल्याचे प्रमाणपत्र (रहिवासी प्रमाणपत्र) आणि गेल्या 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट यांचा समावेश आहे. तुम्हाला तुमचा फोन नंबर आणि तुमची दोन पासपोर्ट फोटो देखील द्यावी लागतील.
ट्रॅक्टर वर कर्ज कसे घ्यावे
ट्रॅक्टर व कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जावे लागेल, बँकेत गेल्यानंतर तेथील संबंधित कर्मचाऱ्यांकडून ट्रॅक्टर कर्जासाठी संबंधित फॉर्म घ्यावा लागेल .हा फॉर्म एकदा वाचल्यानंतर तुम्हाला तो नीट भरावा लागेल. या फार्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, पॅन नंबर ,अचूक भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म बँकेत जमा करावा लागेल. बँक तुमचा फॉर्म तपासून, त्यानंतर एका प्रक्रियेनंतर तुमचे कर्ज पास होईल, ट्रॅक्टर वर सरकारी कर्ज कसे घ्यावे हे बँकेमध्ये जाणून घ्या अर्ज करण्यापूर्वी तेथे सर्व काही जाणून घ्या.