या’ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज ..

या' जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह अति मुसळधार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज ..

राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने मान्सून जमदार कोसळतोय, आज म्हणजे 20 जुलै रोजी कोकण घाटमाथा आणि पूर्व विदर्भात अति जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भांसह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यातही हलक्‍या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभाग वर्तवला आहे.

उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओरिसाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटी 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. या वाऱ्याच्या प्रभावामुळे आज म्हणजे 20जुलै रोजी या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत . मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या फलोदी,कोटा ,शिवनी ,रायपुर, पुरी, ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरातपर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या मध्यभागातून असलेले पूर्व-पश्चिम वाऱ्याचे जोड क्षेत्र समुद्रसपाटीपासून 4.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर सक्रिय आहेत. कोकण घाटमाथ्यावर तुफान पाऊस कोसळतोय, तर विदर्भ मराठवाड्यात ही दमदारपावसाची अतिवृष्टी झाली आहे . आज म्हणजे 20 जुलै रोजी पालघर, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर विदर्भातील भंडारा, गोंदिया ,चंद्रपूर ,गडचिरोली ,जिल्ह्यात अति जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर ,नांदेड,अमरावती, नागपूर ,यवतमाळ, जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  उर्वरित विदर्भात पावसाचा तर हलक्‍या ते मध्यम पावसाचा अंदाज उर्वरित राज्यात हवामान शास्त्र विभाग वर्तवला आहे.

कोकणात धुमशान

कोकणात मंगळवार पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यांच्या बहुतांश भागात वादळी वारे  सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले आहेत. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, भरून वाहत आहेत .रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तसेच खेडची जगबुडी, चिपळूणात वाशिष्ठी नदीला पूर आला आहे.पुराचे पाणी किनाऱ्यावरील लोकवस्तीत शिरल्यामुळे खेड चिपळूणलाही सुमारे दीडशेहून अधिक नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्रात संततधार 

खानदेशातील नाशिक, धुळे ,जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला आहे . नगर ,पुणे जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला आहे.  विशेष म्हणजे घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. सांगलीमध्ये अनेक भागात हलका तर काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे . कोल्हापूर जिल्ह्यात सर्व दूर पाऊस सुरू आहे.

मराठवाड्याला दिलासा

दोन दिवसापासून मराठवाड्याला ही पावसाने चांगलाच दिलासा आहे.  छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, या भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी नांदेड ,परभणी, हिंगोली, लातूर, भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *