ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज, पहा सविस्तर ..

ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज, पहा सविस्तर ..

राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. यामुळे पिकांना काहीसा आधार मिळाला आहे. आज कोकणासह संपूर्ण विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भातील यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, चंद्रपुर, भंडार गोंदिया अमरावती बुलढाणा, वाशिम, वर्धा, अकोला, जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

तसेच मराठवाड्यातील संभाजी नगर, परभणी, बीड , जालना, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुर, नगर, सातारा, सांगली कोल्हापूर, पुणे, जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तर कोंकणातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे.

तर रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग ठाणे, रायगड, जिल्ह्यात काही ठिकाणी तर पुणे, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातील कोंकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पडला. त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागात जोरदार सरीनी हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातही हलक्या ते मध्य स्वरूपाच्या सरी बसरल्या.कोल्हापूर, सातारा, सांगली, जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या.

पावसाने खानदेशात काही मंडळात हजेरी लावली. बहुतांश सलग दुसऱ्या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस झाला. त्यासोबच विदर्भातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. काही भागात नदी नाल्यांना पाणी आले . तर काही भागात अतिवृष्टी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *