भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत ‘ला निना’मुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला .
भारतात जून महिन्यामध्ये मान्सूनचे आगमन होते व मान्सून च्या परतीचा प्रवास सप्टेंबरमध्ये सुरू होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो.सिंचनाशिवाय, जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर देशातील जवळपास निम्मी शेतजमीन अवलंबून असते.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ‘ला निना’मुळे भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार असल्याचेही हवामान विभागाने वर्तवले आहे . ‘ला निना’मुळे मान्सून परतण्यास यापूर्वीही उशीर झाला होता , असेही ते म्हणाले.
कारण काय?
सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार.
सरासरीपेक्षा जास्त पाऊस..
सरासरीपेक्षा ६६ टक्के जास्त पाऊस काही राज्यांत पडला आहे तर यावर्षी भारतात सरासरीपेक्षा सुमारे ७ टक्के जास्त पाऊस पडला आहे.
मान्सूनचा पिकांच्या पेरणीवर परिणाम..
साधारणपणे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीपाची काढणी केली जाते.परंतु मोठ्या प्रमाणातील पावसामुळे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या काढणीस आलेल्या भात, सोयाबीन मका आणि कडधान्यासारख्या पिकांचे नुकसान होऊ शकते. याचवेळी या पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढले व त्याचा फायदा हरभरा ,गहू, शाळू यासारख्या रब्बी पिकांच्या लागवडीमध्ये होईल.
मान्सून लांबणीचा पिकांवर परिमाण
■सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सोयाबीन, मका, भात, कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर पाऊस लांबल्यास परिणाम होणार.
■ गहू, हरभरा खरीप हंगामातील या पिकांना जमिनीत ओलावा राहिल्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो.












