Sugarcane cultivation : सुरू ऊसाची लागवड अजून झालेली नाही? मग या टिप्स वाचाच..

अजूनही अनेक शेतकऱ्यांचे सुरू ऊसाच्या लागवडीचे नियोजन सुरू आहे. सुरू ऊसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. सुरु ऊस लागवड करण्यासाठी को. ८६०३२ (नीरा), को.एम्.०२६५ (फुले २६५), एम.एस.१०००१ (फुले १०००१), को.९४०१२ (फुले सावित्री), को.सी.६७१ (वसंत-१) या जातींची निवड करावी. सुरू उसामध्ये उन्हाळी भुईमूग, कांदा, काकडी, टरबूज, कलिंगड, इत्यादी पिके आंतरपीक म्हणून घेता येतात.

बेणे प्रक्रिया महत्त्वाची:
बुरशीजन्य रोग व खवले किड याच्यापासून प्रतिबंधासाठी ऊस बेणे लागणीपूर्वी १० लिटर पाण्यात डायमेथोएट ३०% प्रवाही २६. ५ मिली. १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम मिसळून १० मिनिटांसाठी बेणे प्रक्रिया करावी. तुमनीचा प्रादुर्भाव असल्यास बीजप्रक्रियेसाठी इमिडाक्लोप्रीड प्रती १० लिटर पाणी वापरून बेणे प्रक्रिया करावी.

अॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक अनुक्रमे १० किलो आणि १२५ किलो प्रती १०० लिटरपाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात उसाच्या टिपऱ्या ३० मिनिटे बुडवून नंतर लागण करावी त्यामुळेनत्रखतामध्ये ५०% ची तर स्फुरद खतामध्ये २५% ची बचत होते.

खताची मात्रा सुरू उसाच्या लागणीच्या वेळी प्रति हेक्टरी २५ किलो नत्र (५५ किलो युरिया), ६० किलो स्फुरद (३६५ किलो सिंगल सुपर फास्फेट) आणि ६० किलो पालाश (१०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. को. ८६०३२ (नीरा) या उसाच्या जातीसाठी २५ टक्के रासायनिक खताची मात्रा जास्त द्यावी.02:36 PM

 
 

Leave a Reply