
Devendra fadanvis : 2013 मध्ये महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू झाला अशा प्रकारचा कायदा करणार महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. त्यानंतर अनेक राज्यांनी महाराष्ट्राचा अनुकरण करत हा कायदा लागू केला, पण अंधश्रद्धेला विरोध करण्यासाठी पहिल्यांदा कायदा करून महाराष्ट्राने आपलं पुरोगामित्व सिद्ध केलं ,पण तरीही जादूटोणा काळी जादू अघोरी पूजा नरबळी अशा अंधश्रद्धेच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडत असल्याचं पाहायला मिळतं.
पण आता या अंधश्रद्धेची महाराष्ट्राच्या राजकारणातही जोरदार चर्चा होताना दिसते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यातच काळी जादू झाल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय, मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत ? याचं उत्तर शिंदे गटातील लिंबू सम्राटांनी द्यावं असं राऊतांनी म्हटलंय तर वर्षा बंगल्यातल्या लॉन मध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्यांची मंतरलेली शिंग पुरल्याचा खळबळजनक दावाही राऊतांनी केलाय. यावरून शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवरही काळी जादू केल्याचे आरोप होत आहेत. एकंदरीतच जादूवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत आता या आरोपांचं केंद्रस्थान वर्षा बंगला असलं तरीही शिंदे ठाकरे आणि फडणवीस यातिघांवरही आजवर काळी जादू किंवा जादू टोण्यासारखे आरोप झाल्याचं पाहायला मिळतं आहे सध्याचे मुख्यमंत्री आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांवर आजवर काळी जादू आणि जादू टोण्याचे कोणते आरोप झाले ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत यावरून वर्षा बंगल्यावर काहीतरी काळी जादू असल्याचा मुद्दा चर्चेत आलाय फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जायची भीती आहे का ? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय पण पाच वर्षांपूर्वी फडणवीसांनी केलेल्या एका यज्ञाची चांगली चर्चा झाली होती.
पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्या चेकमेट हाऊ द बीजेपी वॉन अँड लॉस्ट महाराष्ट्र या पुस्तकात या उल्लेख करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी सरकार स्थापनेच्या दिवशी पहाटे उत्तर भारतातून तांत्रिक पुजारी आणून बगळामुखी देवीला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केल्याचं या पुस्तकात सांगण्यात आलं होतं तसंच ज्योतिषांच्या सांगण्यावरून फडणवीसांनी त्यावेळी निळ्या कोटा ऐवजी काळाकोट शपथविधीला घातल्याचंही त्यावेळी सांगण्यात आलं होतं. यासोबतच नोव्हेंबर 2019 मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल झाला होता त्या व्हिडिओत फडणवीस काही काही पुजाऱ्यांसोबत यज्ञासमोर आरती करताना दिसत होते .
तेव्हा फडणवीसांनी बगळामुखी यज्ञ केल्याचं त्या पोस्टमध्ये सांगितलं होतं तेव्हा काही माध्यमांकडून या सगळ्याची शहानिशा करण्यात आली होती . या व्हिडिओमध्ये करण्यात आलेली पूजा ही खूप आधी झाल्याचं त्यावेळी उपस्थित असलेल्या पुजाऱ्यांकडून सांगितलं गेलं होतं. पण तरीही त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी केलेला मिरची बगळामुखी यज्ञ हा राज्यात चर्चेचा विषय झाला होता. आता बोलू शिंदे बद्दल शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे ठाकरेंनी जून 2022 मध्ये वर्षा बंगला सोडला त्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री होण्याआधी गुवाहाटीत असताना शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतलं होतं.
त्यानंतर एकनाथ शिंदे बद्दल अनेक वेगवेगळ्या चर्चा होत होत्या यामध्ये शिंदे यांच्या दरेगावचा दौरा नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी होता 2024 च्या लोकसभा निवडणुकांधी फेब्रुवारी महिन्यात आदित्य ठाकरेंनी शिंदेच्या दरेगावच्या दौऱ्यावरून खोचक टीका केली होती. गावातल्या लोकांना जाण्यासाठी रस्ता नसताना शिंदेंची दोन दोन हेलिकॉप्टर्स शेतात उतरतात अमावस्या पौर्णिमेला मुख्यमंत्री शिंदे शेती करायला जातात .त्यामुळे त्यांना वेळ नसतो रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात ते नेमकी कुठची शेती करतात असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला होता. इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री असताना दरेगावात गेले होते त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून नाराज असल्याच्या राजकीय चर्चांना मोठं उदाहरण आलं होतं. त्यावेळी आदित्य ठाकरेंना यावरून प्रश्न विचारल्यावर त्यांनी आकाशाकडे बघत चंद्र
दिसतोय का असं म्हणत शिंदेना टोला लगावल्याचं पाहायला मिळालं होतं.
इतकंच नाही तर जानेवारी 2023 मध्ये थेट सामनाच्या अग्रलेखातूनच शिंदे गटावर जादूटोणा केल्याचे आरोप करण्यात आले होते महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यापासून जादूटोणा करणी टाचण्या लिंबू मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसते सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात आणि इतर सरकार कार्यालयात होत असते मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या गटाचे 40 आमदार हे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या मंदिरात गेले तिथे त्यांनी जादूटोण्याचे विधी केले रेडा बळी दिला हे बळी मुख्यमंत्री पदाच्या स्थैर्यासाठी दिल्याचं म्हटलं गेलं शिंदे यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात आणि घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागलेत सुप्रिया सुळे यांच्या साडीला लागलेली आग अजित पवार यांची लिफ्ट दुर्घटना धनंजय मुंडे यांचा अपघात हे सगळं याच राजकीय जादूटोड्यावर होत असल्याचा आरोप त्यावेळी सामनातून केला गेला शिंदे कुठे दौऱ्यावर गेले की ते एखाद्या ज्योतिषी किंवा तंत्रविद्येच्या अभ्यासकाच्या खास भेटीगाठी घेतात हे काही लपून राहिलेलं नाही, ही महाराष्ट्राची प्रगती नसून अधोगती आहे रेड्याचा बळी दिला नाही हे शिंदे आणि त्यांच्या लोकांनी कामाख्या देवीच्या शप्तेवर सांगावं असंही सामनाच्या अग्रलेखातून त्यावेळी सांगण्यात आलं होतं.
याबरोबरच बदलापूर अत्याचार प्रकरणावरून शिंदेंवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा अर्धावे तंत्रमंत्र जादूटोणा यात जात असतो बदलापुरातलं आंदोलनही मुख्यमंत्र्यांना जादूटोणा वाटला असेल असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरतायेत त्यांचं कुटुंब का घाबरतंय वर्षा बंगल्यावर असं काय घडलंय की फडणवीस तिथे जायला घाबरतायेत तिथे नेमकं काय घडलंय की या आधी तिथे असणाऱ्यांनी घडवलंय असा सवाल करत राऊतांनी शिंदेवर टीका केली आहे . वर्षा बंगल्याच्या लॉन मध्ये काहीतरी खोदकाम केलं होतं तिथं कामात देवीसमोर कापलेल्या रेड्यांची मंतरलेली शिंग पुरली आहेत अशी तिथला स्टाफ आणि भाजपच्या गोटात चर्चा आहे याची महाराष्ट्राला चिंता लागली असून शिंदे गटातल्या लिंबू सम्राटांनी याचं उत्तर द्यावं असं राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे एकंदरीतच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांचा जादूटोणाशी संबंध जोडून ठाकरे गटाने खळबळ उडवल्याचं पाहायला मिळतंय आता ठाकरे गट आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर जादू टोण्याचे आरोप केले असले तरी उद्धव ठाकरेंवरही अशा प्रकारचे आरोप भाजपा आणि शिंदे गटाकडून होत असल्याचं पाहायला मिळतंय जानेवारी 2023 मध्ये सामनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर आरोप करण्यात आल्यानंतर तेव्हा मंत्री शंभूराज देसाईंनी माध्यमांशी बोलताना ठाकरेंवरही आरोप केल्याचं पाहायला मिळालं होतं.
2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून वर्षा बंगल्यावर राहायला जाणार होते तेव्हा बंगल्याची साफसफाई करण्यात आली तेव्हा तिथं पोतभर लिंबू मिरच्या सापडल्याचं तिथल्या लोकांनी सांगितलं होतं असं देसाई यांनी त्यावेळी म्हटलं होतं आताही संजय राऊतांच्या विधानावरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय उद्धव ठाकरे हे जादूचे बादशाह आहेत ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी वर्षा बंगलामध्ये एक टोपलीभर लिंब सापडली होती. हे एकनाथ शिंदे यांनीही सांगितलंय असं रामदास कदम यांच्याकडून सांगण्यात आलंय तर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरे यांवर आरोप करताना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून मातोश्रीवर लिंबू कापलं जातंय काळी जादू केली जाते उपास तपास केले जात आहेत साधुसंतांना भेटलं जातंय अशी टीका नितेश राणें कडून करण्यात आली आहे एकंदरीतच जादू टोणा काळी जादू हे शब्द सध्या राज्याच्या राजकारणात चांगले चर्चेत असल्याचं दिसून येतंय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमच्या वेब साईडला भेट द्यायला विसरू नका . .