Chief Minister’s : आमचे पीए, ओएसडी, पीएस यांची नेमणूक करण्याचे सुद्धा आम्हाला अधिकार नाहीत, अशी जाहीर खंत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी व्यक्त करून भाजपावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे हे वक्तव्य खोडून काढले असून हा अधिकार मुख्यमंत्र्याचाच असतो असे ठणकावून सांगितले आहे.
यापूर्वी अनेक पीए, ओएसडींचा भ्रष्टाचारात सहभाग असल्याचे दिसून आल्याने यंदा मुख्यमंत्री कार्यालयाने या नेमणुकांवर अंकूश ठेवल्याचे दिसून येत असून मी ‘फिक्सर’ नेमू दिला नाही असेही त्यांनी ठणकावले आहे. त्यामुळे हा एक प्रकारे माणिकराव कोकाटेंना इशाराच दिल्याचे समजते.
माणिकराव कोकाटेंना मागच्याच आठवड्यात नाशिकच्या कोर्टाने फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद धोक्यात होते. पण ते जिल्हा न्यायालयात अपिलात गेले आणि स्थगिती मिळवली. त्यामुळे तात्पुरते मंत्रीपद वाचले आहे, पण तरीही भाजपातील वरिष्ठ त्यांच्यावर नाराज आहेत. नैतिकतेच्या दृष्टीने त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी भाजपाची इच्छा आहे. परंतु सध्या तरी तसे होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान फसवणुक केली म्हणून एका बाजूला शिक्षा झालेल्या कृषी मंत्री कोकाटे यांनी सार्वजनिक ठिकाणी सरकारविरोधी वक्तव्य केल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट इशारा दिल्याचे समजते. सध्या तरी भाजपाकडे संख्याबळ पुरेसे असून त्यांना आता राष्ट्रवादी आणि शिंदे सेना या दोघांचीही गरज नसल्याचे समजत आहे. त्यातच माजी कृषीमंत्री व विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह कृषी मंत्री कोकाटे अडचणीत आल्याने भाजपाकडून नाराजी व्यक्त केली जात असून भविष्यात भाजपाच्या चांगल्या कामगिरीसाठी या दोन्ही पक्षांना डच्चू देण्यात येऊ शकतो अशाची चर्चा आहेत.












