सध्या राज्यभर पावसाने उघडीत दिल्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत पावसाअभावी खरीप पिके सुकून जाऊ लागले आहेत. तर फळबागा देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
अनेक शेतकरी फळबागा जगण्यासाठी पाणी हे टॅंकरने विकत आणून फळबागेला देत आहेत. तर काही शेतकरी आपल्या पिकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे पाणी देत असल्याचे चित्र सध्या राज्यभर पाहायला मिळत आहे. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्यापासून पिकांना वाचवायचे कसे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहे. असे शेतकरी पिकांना पाणी देत आहेत . परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध नसल्या कारणामुळे पिक कसे वाचवायचे यावर सर्व शेतकऱ्यांचे भर आहे.
दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन महिन्यांपासून जास्त पाऊस पडलेला नाही. त्याच बरोबर उष्णतेचे देखील मोठे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे वाढते उष्णतेपासून डाळिंब बागेचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळी कृती करून आपली फळबाग वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
असेच आपली फळबाग वाचवण्यासाठी सांगोला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबावर कापडी अच्छादन टाकले असल्याचे पाहायला मिळत आहेत . त्यामुळे डाळिंब बागेचे संरक्षण केले जाते.
सध्या राज्यभर पाऊसाने खंड दिला असल्या कारणामुळे पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून उष्णतेचे देखील प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे वाढत्या तापमानामुळे डाळिंबावर काळे डाग येण्याचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर इतर रोग देखील डाळिंब फळावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उष्णतेपासून डाळिंबाचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी युक्ती लढवलेली आहे . यामुळे सध्या शेतकऱ्यांची परिसरामध्ये चर्चा रंगली आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये कपाशीची लागवड केली होती . आता ती कपाशी फुल आणि कैरी लागण्याच्या बहरात आहे. मात्र यावेळी कैरी परिपक्व होण्यासाठी पाण्याची जास्त गरज असते. परंतु अशा ठिकाणी कापशीला पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे पावसाचा खंड असल्या कारणामुळे बहार वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्याचबरोबर पुरेशा पाणी अभावी फुलपाती लागलेल्या झाडाची वाढ खुंटते आणि पाणी न मिळाल्यामुळे फुलपातीची गळती देखील सुरू होत आहे. त्यामुळे कपाशीचे सर्वाधिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे . यावेळेस कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.