पावसामुळे भाज्यांचे दर महागले असून, आता मुंबईमध्ये एका किलो टोमॅटोचा दर तब्बल 160 रुपये झाला आहे. तर येत्या दोन दिवसात हा दर दोनशे रुपये पार करेल असे सांगितले जात आहे .
टोमॅटो सोबतच अनेक भाज्यांचे दर देखील वाढले आहेत. त्यातच चहाचा स्वाद वाढवणारे व स्वयंपाक घरातील गुणकारी म्हणून ओळखले जाणारे अद्रक चा दर देखील 320 रुपये झाला आहे .टोमॅटोचे भाव गडगडल्यानंतर देशाने अनेक ठिकाणी लाल चिखल पाहिला होता, पण यावेळी टोमॅटोचे भाव ऐकूनच ग्राहकांचे चेहरे लालबुंद होत आहेत.
मागणी अधिक पण पुरवठा घटला
महाराष्ट्रातून टोमॅटोचा पुरवठा देशभरात केला जातो. त्यामुळे बाजारात टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला आहे.टोमॅटोची आवक घटल्याचे सांगितले जात आहे. मागणी जास्त असून आवक कमी आहे . टोमॅटोची अवाक 20 टक्क्यांवर आली आहे. तर काही ठिकाणी काळाबाजार होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे.