सध्या देशातील विविध राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. विशेषतः उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे .हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस म्हणजे आठ जुलै पर्यंत देशातील अनेक राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.
कुठे कुठे पावसाचा अंदाज
हवामान अंदाजानुसार कोकण ,गोवा व महाराष्ट्रात पाच आणि सहा जुलैला तर गुजरात मध्ये सात जुलैला पाऊस पडण्याची शक्यता आहे .याशिवाय इतर ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे .ज्यामध्ये आसाम ,आंध्र प्रदेश, मेघालय, तेलंगणा, कर्नाटकात, मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच तमिळनाडू ,सिक्कीम, मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ जुलै रोजी ओडिसा राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुजरात , राजस्थान, झारखंड या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
उत्तर भारतातील हरियाणा ,पंजाब, चंदिगड ,व दिल्ली येथे सहा ते आठ जुलै पर्यंत पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पाच ते सहा जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो. यासोबतच सात ते आठ जुलै रोजी झारखंड पश्चिम राजस्थान व गुजरातच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.
दिल्लीत पावसाचा अंदाज
मान्सून सुरू झाल्यापासून दिल्लीत सतत पाऊस पडत आहे.या आठवड्यातही दिल्लीत मुसळधार पाऊसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पावसानंतर काही भागात रस्त्यावर पाणी तुडुंब भरले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात व कोकण मध्ये ऑरेंज अलर्ट.
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात व कोकण मध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आव्हान प्रशासनाने केले आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे .विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.