राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर गुरुवार पासून मध्य महाराष्ट्र , कोकण, आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यांना विजा, मेघगर्जना आणि वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आला आहे .
त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात पुढील २ ते ३ दिवस वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. गुरुवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, जिल्ह्यात विजा आणि वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
तर मराठवड्यातील धाराशिव , लातूर, जिल्ह्यासह पुणे , रायगड जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, ,कोकण, मराठवड्यातील शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठेवावा. तसेच मेघगर्जना आणि वीजांचा कडकडाट लक्षात घेता, जनावरांना या कालावधीमध्ये गोठ्यात बांधावे , असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ किनाऱ्यावरील ठळक दाब क्षेत्र जास्त तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहे . देशात पूर्व मध्य प्रदेशातील सिधी इथे नीचांकी ११.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. केरळच्या किनारपट्टीवर हवेचा कमी दाब पट्टा सक्रीय आहे.राज्यात नाशिक येथे नीचांकी १३.४ अंश सेल्सियसची नोंद झाली.
कुठे कुठे कोसळणार पाऊस ?
वादळी वारा आणि विजांसह १५ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्याला आहे.विदर्भ , कोकण, मध्य महाराष्ट्र, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यता आली आहे. पालघर, ठाणे,धुळे, नाशिक, नगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.