कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला आहे . आज कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे .तरी उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पश्चिम भाग हा दक्षिणेकडे कायम असून पूर्व भाग काहीचा उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे मान्सून हा राजस्थान जैसलमेर ,अजमेर, सिद्धी, शिवपुरी, शांतिनिकेतन, मनिपुर, पर्यंत सक्रिय आहे.
कोकण घाट माथ्यावर सुरू असलेला मान्सूनचा जोर कमी झाला असून विदर्भात मात्र काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
जोरदार पावसाचा इशारा यलो अलर्ट
रत्नागिरी ,सिंधुदुर्ग
विजांसह पावसाचा इशारा
बुलढाणा, अमरावती, अकोला ,वाशिम ,वर्धा, नागपूर ,गोंदिया, भंडारा ,चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली,.