पावसाचे उशिरा झालेले आगमन, बदललेल्या निसर्ग चक्रामुळे टोमॅटोच्या किमती खूप वाढल्या आहेत. भाजीपाला पिकवणाऱ्या उत्तरेकडील राज्यात कुठे ढगफुटी, अतिवृष्टीमुळे अशा बदललेल्या निसर्गचक्रामुळे टोमॅटो, आलं, भाजीपाल्यांचे दर हे खूप वाढलेले आहेत.
टोमॅटोचे दर प्रचंड वाढले असल्यामुळे ग्राहक विक्रेत्यांच्या अंगावर येत आहेत.त्यामुळे काही राज्यांमध्ये टोमॅटो विक्रीसाठी बाऊन्सर नेमण्याची गरज निर्माण झालेली आहे. आपल्या सुरक्षितेसाठी हा खर्च करावा लागत आहे. टोमॅटो बाजारामध्ये 160 रुपये किलो आहेत .त्यामुळे लोक केवळ 50 किंवा 100 ग्रॅम टोमॅटो घेत असल्याने वाद होत आहेत. त्यामुळे विक्रेत्यांनी काही माणसे आपल्या दुकाना पुढे उभे केले आहेत .वाराणसी येथील भाजीपाला विक्रेते अजय फौजी यांनी ही माहिती दिली आहे.
मध्यप्रदेशच्या अशोक नगरातील स्मार्टफोन विक्रेत्यांनी देखील एक आकर्षक ऑफर दिली आहे. या ऑफरनुसार जर तुम्ही मोबाईल विकत घेतला तर तुम्हाला कॉम्पलीमेंटरी म्हणून हेडफोन न देता दुकानदार टोमॅटो देत असल्याने दुकानात गर्दी वाढल्याचे विक्रेते अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले. जे मोबाईल खरेदी करतील त्यांना दोन किलो टोमॅटो मोफत भेट म्हणून दिले जात आहे .यामुळे मोबाईलच्या विक्रीमध्ये वाढ होत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले आहे.
टोमॅटोच्या भावात पाच पट वाढ
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने टोमॅटोची सरासरी किंमत सध्या 100 रुपये किलो झाली आहे. परंतु काही ठिकाणी यापेक्षाही ज्यादा किंवा किंचित कमी असू शकते. अनुक्रमे दिल्लीमध्ये 127 रुपये, लखनऊ 105 रुपये, चेन्नई 105 रुपये ,दिब्रुगड 115 रुपये ,किलो टोमॅटोचा भाव सांगण्यात आलेला आहे . साधारणपणे उत्पादन कमी होत असल्याने दरवर्षी साधारणपणे जून आणि जुलै या महिने दरम्यान टोमॅटोचे दर दरवर्षी वाढतात. यंदा तर पाचपट वाढ झाली आहे.