राज्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस हवामान मिश्र राहील. असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण च्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे .
तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. तर काही भागांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षाच आहे .पाऊस न आल्यामुळे बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे. राज्याच्या अनेक भागात शेतीमधील पेरण्या खोळंबल्या आहेत.
आज विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे .मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.राज्यात 23 जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे
.मात्र विदर्भ, उत्तर महाराष्ट्र ,आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडात सह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. पुढील दोन दिवसासाठी राज्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे .तर राज्यात , ठाणे, मुंबई सह उपनगर जिल्ह्यासह कोकणात चांगला पाऊस पडत आहे. तसेच अन्य काही जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावलेली आहे.