Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्येतील आरोपींना 9 डिसेंबरलाच पकडता आलं असतं? नवीन CCTV फुटेजनंतर आरोप काय होतायत?

Santosh Deshmukh : मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने उलटून गेलेत पण या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे . त्यामुळे देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी आता तपासावर संशय व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे . तसंच कधी नव्हे ते देशमुखांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या त्यांचा तपासावर परिणाम होतोय असा स्पष्ट आरोप आपल्या निवेदनामध्ये केला आहे.  एकीकडे हे सगळं होत असतानाच आता देशमुखांच्या हत्या च्या दिवशीच म्हणजेच 9 डिसेंबर 2024 च एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय मुख्य म्हणजे हत्येच्या दिवशीच पोलिसांकडून आरोपींचा पाठलाग केला जात होता.  पण तरीही आरोपी निसटल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचं सांगितलं जातंय.

त्यामुळे देशमुखांच्या मारेकरांना हत्येच्या दिवशीच अटक करता आली असती असा दावा आता केला जातोय.  संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी नक्की काय झालं होतं सीसीटीव्ही फुटेज मध्ये नक्की काय समोर आलंय त्यावेळी आरोपी पोलिसांच्या तावडीतून नक्की कसे निसटले ?

आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणावरून झालेल्या वादात संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केल्यामुळेच देशमुखांची हत्या झाल्याचे आरोप झाले.  9 डिसेंबरला संतोष देशमुख हे आपले मावस भाऊ शिवराज देशमुख यांच्यासोबत कार मधून जात होते त्यांची गाडी दुपारी तीन च्या सुमारास डोनगाव फाट्यावरील टोलनाक्याच्या परिसरात आली त्यावेळी अचानक एमएच 4493 या नंबर वरची काळी स्कॉर्पियो गाडी देशमुखांच्या गाडीसमोर आडवी उभी झाली.  स्कॉर्पियो मधून पटापट सहा जण बाहेर आले आणि त्यांच्यातला एकानं देशमुखांच्या गाडीच्या दरवाजाची काच दगडानं फोडली त्याच दरवाजातून देशमुखांना जबरदस्तीने बाहेर काढलं आणि काठीनं मारहाण करायला सुरुवात केली.  मारहाण करतच ओढत ओढत त्यांना स्कॉर्पियो मध्ये बसवलं त्यानंतर लगेचच स्कॉर्पियो भरदाव वेगाने निघून गेली.  त्यानंतर देशमुखांना विविध हत्यारांनी बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यातच देशमुखांचा मृत्यू झाला झाला त्यानंतर बोरगाव दहिटना रोडवर संतोष देशमुख यांचा मृतदेह सोडून आरोपी पसार झाले होते. 

मात्र मृतदेह सापडताच पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आरोपी कुठे जाऊ शकतात.  याचा अंदाज घेत खबऱ्यांचा नेटवर्क ऍक्टिव्ह करत पोलिसांनी जाळ विणलं होतं.  तरीही आरोपींनी पोलिसांना चकवाद दिला होता.  आता आरोपींनी पोलिसांना कशी हुलकावणी दिली याबाबत सीसीटीव्ही फुटेज मधून सगळं काही समोर आलंय सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपी त्याच स्कॉर्पियोतून केस पाहून पासून सुमारे 50 ते 55 km तर धराशिव पासून जवळपास 60 km अंतरावर असलेल्या वाशीमध्ये पोहोचले होते . त्यावेळी संध्याकाळचे 7:00 वाजले होते त्याच वाशी मधलं सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जातंय.  हे सीसीटीव्ही फुटेज 7:10 मिनिटांचा असून देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्यांचे मारेकरी नक्की कसे निसटले याबाबत या सीसीटीव्ही फुटेज मधून माहिती मिळत असल्याचं सांगितलं जातंय या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्की काय दिसतंय ते आता बघूयात देशमुख हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार ,कृष्णा आंधळे ,जयराम चाटे ,प्रतीक घुले हे देशमुखांचे मारेकरी एकत्रच होते.  हे सगळेजण त्यांच्याकडच्या स्कॉर्पियोतून थेट धाराशिव मधल्या वाशी इथे आले यावेळी पोलीसही त्यांचा माग काढत होते . मारेकरी धाराशिवच्या दिशेने गेल्यानंतर पोलीसही त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते. 

त्यावेळी एका ठिकाणी पोलिसांनी आपली जीप आरोपींच्या स्कॉर्पियोला आडवी लावली.  पण स्कॉर्पियो चालवणाऱ्या आरोपीनं जागेवरच गाडी वळवून गाडी थेट वाशीच्या बाजारपेठेत घातली तेव्हा पोलिसांनी त्यांचा बाजारपेठेतही पाठलाग सुरू केला बाजारपेठेतले रस्ते अरुंद होते त्यामुळे स्कॉर्पियो फार पुढे जाणार नाही याचा अंदाज आरोपींना आला असावा त्यावेळी संध्याकाळचे साधारण सात वाजले होते ही मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या बाजारपेठेत तेव्हा मोठी गर्दी होती.  तेव्हा मागावर असलेले पोलीस आणि अरुंद रस्त्यांवरील गर्दी पाहून आरोपींनी गाडी बाजारपेठेतल्या पारा चौकातच थांबवली त्यातून पटापट सहा आरोपी बाहेर पडले आणि एकाच दिशेने त्यांनी पळ काढल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय त्यानंतरही पोलिसांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण आरोपी गर्दी आणि अंधाराचा फायदा घेऊन गल्ली बोोळातून पसार झाले वाशी परिसरात असणाऱ्या साखर कारखान्याच्या वाटेनं हे सहाही आरोपी जंगलाच्या दिशेने पळून गेल्याचं या फुटेजमध्ये दिसत असल्याचं सांगितलं जातंय त्यानंतर आरोपी 4 km चे अंतर पायी चालल्याची ही माहिती मिळत आहे आरोपी पसार झाल्यानंतर आरोपींनी बाजारपेठेत सोडलेल्या स्कॉर्पियोचा पोलिसांनी ताबा घेतला . तेव्हा स्कॉर्पियोमध्ये हे कुणीच नव्हतं पण त्यात रक्ताचे डाग आढळून आले त्यानंतर जप्त केलेली स्कॉर्पियो सुदर्शन घुलेची असल्याचं पोलिसांना समजलं आता वाशीमधील पारा चौकातील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आल्यानंतर आरोपी पोलिसांसमोरून पळून गेल्याचा आरोप होऊ लागलाय.  याबाबत धनंजय देशमुख म्हणाले की सगळे आरोपी वाशीच्या हद्दीत गाडी सोडून पळाले.

आरोपींना पकडण्यासाठी पोलीस त्यांच्या मागावर होते ते कुठलं जंगल आहे त्या जंगलातून बाहेर पडण्याचे कोणते मार्ग आहेत याची माहिती पोलिसांना असायला हवी होती त्या रस्त्या त्यावर पोलीस यंत्रणा असती प्रत्येक जागेवर एका पोलिसाला रेकी करायला ठेवलं असतं तर आरोपी वाशीच्या जंगलातून बाहेर गेले नसते तसंच वेळेवर ॲट्रॉसिटी दाखल केली असती तरी घटना घडली नसती पण पोलिसांचे हात काळे झाले आहेत असाही आरोप आता धनंजय देशमुखांकडून केला जातोय.  दरम्यान 9 डिसेंबरच्या दुपारी तीन वाजता देशमुखांचे अपहरण झालं त्यानंतर पाच च्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला त्यानंतर पसार झालेले आरोपी सायंकाळी सातला धाराशिव मधील वाशीमध्ये पोहोचले त्यामुळं दुपारी तीन ते सायंकाळी सात या चार तासांच्या काळात नेमकं काय घडलं आणि आरोपी वाशीपर्यंत कसे पोहोचले याचा तपास पोलीस करत आहेत. 

वाशीपर्यंत हे सहा आरोपी एकत्रच होते. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेल्याची शक्यता आहे कारण या प्रकरणातील जयराम चाटे महेश केदार यांना या हत्येनंतर काही दिवसांमध्ये अटक झाली होती त्यानंतर विष्णू चाटेला अटक करण्यात आली प्रतीक घुलेला पुण्यातील रांजणगाव मधून अटक केली गेली. दर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं तर सहावा आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे पोलिसांनी आरोपींना काहीही करून अटक करायची आहे .या उद्देशाने फिल्डिंग लावली असती तर आरोपी पळून गेले नसते. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी लागलेला 26 दिवसांचा वेळ वाचला असता अशी ही चर्चा हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर होऊ लागली आहे. तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 9 डिसेंबर 2024 लाच  वाशीमध्ये पकडणं शक्य होतं का तसं झालं असतं तर या प्रकरणाचा तपास वेगाने होण्यास मदत झाली असती का धनंजय देशमुख यांच्याकडून पोलिसांवर होणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य आहे का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा . 

Leave a Reply