Ajit Pawar : सुरेश धस आणि सोळंकेंना धक्का,धनंजय मुंडे स्वागताला,अजित पवार यांनी बीड दौऱ्यातून काय साधलं ?

ajit pawar : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड नाव समोर यायला सुरुवात झाल्यापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरायला लागली होती.  त्यानंतर अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलं ,त्यामुळे बीड मधल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अजित पवार कठोर पावलं उचलतील असं बोललं जात होतं.  त्यातच अजित पवारांनी 30 जानेवारीला बीड दौरा केला . पालकमंत्री झाल्यापासून अजित पवारांचा हा पहिलाच बीड दौरा असल्यामुळे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

बीडमध्ये पाऊल ठेवताच अजित दादांनी बैठका आदेश आणि कारवाईचे इशारे द्यायला सुरुवात केली.  अजित दादांनी बीडमध्ये जाऊन एकीकडे पदाधिकाऱ्यांना शिस्तीत काम करण्याचा इशारा देत धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांना कानपिचक्या दिल्या तर दुसरीकडे जिल्हा नियोजन सदस्य समितीवरून अजित दादांनी सुरेश दस आणि प्रकाश सोळंके यांना हटवलं त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बीडमध्ये होत असलेल्या सगळ्या घडामोडींकडे लक्ष देऊन अजित पवार आता बीडचे पालकमंत्री म्हणून ॲक्शन मोड मध्ये आल्याच्या चर्चा सुरू झाल्यात . बीड मध्ये गेल्यानंतर अजित दादांनी नक्की काय काय निर्णय घेतले अजित दादांनी धस आणि सोळंकेना जिल्हा नियोजन समितीवरून हटवून , 30 जानेवारीला अजित दादा सकाळी सात वाजताच बीडमध्ये दाखल झाले त्यानंतर अजित पवार परळी मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात गेले ,तिथे स्वतः धनंजय मुंडेंनी अजित दादांचे स्वागत केलं यावरून आता बीडमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलय राजीनाम्यासाठी एकीकडे दबावतंत्र सुरू असतानाच पक्ष नेतृत्वाने आदेश दिला, तर मी पदाचा राजीनामा देईल असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं .

पण आता परळीत मुंडेंनीच अजित दादांचे स्वागत केल्यामुळे अजित पवार अजूनही धनंजय मुंडे यांच्या बाजूने आहेत असं बोललं जातंय ,अजित दादा मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या विचारात असते तर त्यांनी बीडच्या आपल्या दौऱ्यात धनंजय मुंडेंना लांब ठेवलं असतं पण असं न करता मुंडेंनीच दादांचं स्वागत केलं इतकंच नाही तर धनंजय मुंडे बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही हजर होते त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत सध्या तरी अजित पवारांचा कोणताही विचार नसल्याचं अजित पवारांच्या बीड दौऱ्यातून दिसून आल्याचं सांगितलं जातंय . अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याआधी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या बैठकीत अजित दादांनी पदाधिकाऱ्यांना खडसवताना अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंचे कान टोचत त्यांना सावधानतेचा इशारा दिल्याचं बोललं जातंय विकास काम करत असताना कोणीही कोणाकडं खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नये जर असले प्रकार माझ्या कानावर आले तर मी मोका लावायलाही मागे पुढे बघणार नाही यासाठी मी टोकाची भूमिका घेणार आहे . कारवाई करताना आम्ही कोणताही भेदभाव करणार नाही, तुमच्या चुका पदरात घालून घालून माझा पदरच राहिला नाही सतत चुकांवर पांघरून घालून पांघरूनही फाटायला लागलंय असं अजित दादांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना खडसावून सांगितलं थोडक्यात अजित दादांनी पदाधिकाऱ्यांना दम भरताना दुसरीकडे धनंजय मुंडेंना सुद्धा अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी कमी करण्याचा इशारा दिल्याची चर्चा सध्या बीडमध्ये होते. 

एकीकडे अजित दादांनी धनंजय मुंडेंना जरी सावधानतेचा इशारा दिला असला तरी दुसरीकडे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका जिथे काही तथ्य असेल तिथेच कारवाई करणार आहे . उगाच कोणावरही कारवाई केली जाणार नाही, असंही अजित पवारांनी म्हटलंय आता अजित दादांनी केलेल्या या विधानानंतर अजित दादा इथपर्यंतही धनंजय मुंडे यांच्याच बाजूने आहेत असं आता बोललं जातंय अजित पवारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना फैलावर घ्यायचं काम काम केल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणारे भाजपा आमदार सुरेश दस आणि आपल्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनाही एक धक्का दिलाय.

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर अजित पवारांनी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली . या बैठकीच्या आधी अजित पवारांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला.  अजित दादांनी बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती केली.

बीडमध्ये आता तरुणांना संधी देण्याची गरज असल्याचंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं याच निर्णयाला पूरक असा दुसरा निर्णय अजित पवारांनी घेतला तो म्हणजे जिल्हा नियोजन सदस्य समितीमधून अजित दादांनी भाजपच्या सुरेश धस आणि आपल्याच पक्षाच्या प्रकाश सोळंके यांना वगळलं आता सुरेश धस आणि प्रकाश सोळंके हे तेच दोन नेते आहेत.  ज्यांनी धनंजय मुंडेंचे घोटाळे दादांसमोर मांडून धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेण्याची मागणी केली होती.  सुरेश हे बीडमधील नवनवीन प्रकरण समोर आणून हा बीडच्या गुन्हेगारीचा परळी पॅटर्न असल्याचं सातत्याने सांगतायेत यामुळे धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न धस करत असल्यामुळे अजित पवारांनी धसांना धक्का दिल्याचं आता म्हटलं जातंय.

धनंजय मुंडेवर आरोप करणाऱ्या सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना जिल्हा नियोजन समितीवरून हटवून यातूनही अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराकण केल्याचा मेसेज जात असल्याचं बोललं जातंय, तसंच धस आणि सोळंके यांना हटवून दादांनी या दोघांनाही बीड जिल्ह्यावरून राजकारण करू नका असा सुप्त इशाराच दिल्याचं म्हटलं जातंय.  पण एकीकडे हे सगळं करत असतानाच अजित दादांनी धस आणि सोळंकेना जिल्हा नियोजन समितीवरून हटवून लोकांची नाराजी ही ओढावून घेतल्याची चर्चा होते.  कारण या निर्णयामुळे अजित दादा धनंजय मुंडेंना राजश्रय देत आहेत असं चित्र उभं राहण्याची शक्यता आहे . यासोबतच अजित दादांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता सुरेश दस अधिकच ऍक्टिव्ह होण्याची चर्चा होते.  कारण अजित दादांच्या दौऱ्यात आधी सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील घोटाळ्यांचा पुरावा अजित दादांच्या पीए कडे सुपुर्द केल्याचं धस यांनी स्वतः म्हटलंय यामुळेच आता अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीवरून धसांना हटवून धसांना शांत करण्याऐवजी त्यांना जास्तच ऍक्टिव्ह केल्याचं म्हटलं जातंय.  त्यामुळे अजित दादांनी बीडमध्ये येऊन धस आणि सोळंकेबाबत घेतलेला निर्णय दादांच्याच अंगलटी येणार नाही ना असाही प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय एकंदरीतच पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी केलेला हा पहिलाच बीड दौरा चांगलाच गाजला एका बाजूला बीडमध्ये येत अजित दादांनी धनंजय मुंडेंना कानपिचक्या दिल्याचंही दिसलं तर दुसरीकडे जे सुरेश दस आणि प्रकाश सोळंके यांनाही अजित दादांनी इशारा दिल्याचं दिसून येतंय तसंच आपल्या पदाधिकाऱ्यांनीही सज्ज दम भरत आपण वाटेल ते खपून घेणार नाही असंही सांगायचा अजित पवारांनी प्रयत्न केलाय त्यामुळे अजित पवारांनी बीडची सूत्र आता आपल्या हाती घेतली असून संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर होणाऱ्या आरोपांकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचं दिसून येतंय.  बीडच्या बाबतीत आपण कुठलाही चुकीचा प्रकार खपवून घेणार नाही हे सांगत अजित पवारांनी मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना अलर्ट केलंय तर बीड वरून राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका असाही मेसेज धस आणि सोळंके देत अजित पवारांनी त्यांना धक्का दिल्याच्या चर्चा होत आहेत तुम्हाला काय वाटतं अजित दादांनी बीडमध्ये येऊन नक्की कोणाचा गेम केलाय अजित दादांचा बीड दौरा आणि त्यांनी घेतलेले निर्णय धनंजय मुंडे साठी फायद्याचे ठरतील का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण लेख पाहण्यासाठी  कृषि २४.कॉम या वेब साईडला भेट द्यायला विसरू नका .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *