Wheat stock : गव्हाच्या साठ्याची माहिती दर शुक्रवारी द्यावी लागणार, व्यापाऱ्यांसाठी नवीन नियम लागू..

Wheat stock

Wheat stock : भारत सरकारने अन्न सुरक्षेचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि चुकीच्या अंदाजांना आळा घालण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२५ पासून देशभरातील व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठ्या साखळीद्वारे व्यवहार करणारे विक्रेते तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांना त्यांच्या गव्हाच्या साठ्याची माहिती सरकारच्या अधिकृत पोर्टलवर नोंदवावी लागणार आहे.

गहू साठवणुकीसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेली साठा मर्यादा ३१ मार्च २०२५ रोजी संपणार आहे. त्यामुळे संबंधित संस्थांनी त्यांच्याकडील गव्हाच्या साठ्याची माहिती जाहीर करणे आवश्यक आहे. ज्या संस्थांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांना पोर्टलवर नोंदणी करून साठ्याची माहिती द्यावी लागेल. एकदा नोंदणी झाल्यानंतर दर शुक्रवारी गहू साठ्याचा तपशील अपडेट करणे बंधनकारक असेल.

सरकारच्या या निर्णयामुळे गव्हाच्या साठ्यावर अधिक नियंत्रण ठेवता येणार आहे आणि देशभर गव्हाची सहज उपलब्धता सुनिश्चित केली जाईल. साठेबाजांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग गव्हाच्या साठ्यावर सतत लक्ष ठेवून असून व्यापाऱ्यांनी वेळेत नोंदणी करून आवश्यक माहिती अपडेट करावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

गव्हाच्या साठ्याची माहिती नोंदवण्यासाठी व्यापारी आणि विक्रेत्यांनी खालील अधिकृत पोर्टलला भेट द्यावी:
https://evegoils.nic.in/wsp/login

Leave a Reply