कापूस विकायचा की साठवायचा?

आज सकाळी कोपरना बाजारात कापसाला (Kapus bajarbhav) सरासरी 7 हजार रुपयांचा प्रती क्विंटल बाजार भाव मिळाला. या ठिकाणी सुमारे साडेतीन हजार क्विंटल आवक झाली आहे. सध्या बाजारात लांब आणि मध्यम स्टेपलच्या कापसाला (cotton Market price) सरासरी 7 हजार दोनशे ते 7 हजार 300 रुपयांचा भाव मिळत आहे, तर लोकल कापसाला सरासरी 7 हजार रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. दिवाळीपासून बाजारात कापसाची आवक वाढत असून मागच्या संपूर्ण आठवड्याचा आढावा घेतला, तर असे लक्षात येते की कापसाचे बाजारभाव हळूहळू वाढताना दिसत आहेत.

यंदाच्या वर्षी कापसाच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. मध्यम स्टेपलला 7121 रुपये प्रति क्विंटल, तर लांब स्टेपलच्या कापसाला 7521 रुपये प्रति क्विंटल असे हमीभाव आहेत. मात्र सध्या तरी बाजारात हे दर हमीभावापेक्षा कमीच आहेत.

कापसाच्या उत्पादनाचे असे आहे गणित:

२०२४-२५ साठी जागतिक कापूस ताळेबंदात, उत्पादन, उपभोग, व्यापार आणि प्रारंभ आणि समाप्ती साठा सर्व कमी केले आहेत. चीनमधील मोठ्या पिकाची भरपाई करण्यापेक्षा युनायटेड स्टेट्स, भारत आणि पाकिस्तानमधील लहान पिके म्हणून जागतिक उत्पादन सुमारे १.२ दशलक्ष गाठी कमी झाले आहे. व्हिएतनाममध्ये २,००,००० गाठी कमी झाल्यामुळे आणि बांगलादेश आणि तुर्कीमध्ये १००,००० गाठी कमी झाल्यामुळे जागतिक वापर सुमारे ४,६०,००० गाठी कमी झाला आहे. चीन, व्हिएतनाम, तुर्की आणि बांगलादेश यांनी आयात कमी केल्याने भारतातील वाढीची भरपाई झाल्यामुळे जागतिक व्यापार सुमारे ५५०,००० गाठी कमी झाला आहे. जागतिक स्तरावरील शेअर्स आॅगस्टपासून १.१ दशलक्ष गाठी कमी होऊन सुमारे ७६.५ दशलक्ष झाले आहेत.

सध्याची स्थिती काय?

वाढता खप आणि नियार्तीमध्ये विक्रमी कमी साठा असलेल्या भारताच्या कापूस क्षेत्राला गंभीर स्थितीचा सामना करावा लागत आहे. उत्पादन अंदाजांमधील विसंगती आधीच आव्हानात्मक आहे, जागतिक बाजारपेठेत पुरवठा स्थिरता आणि स्पर्धात्मकता सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.

डिसेंबरपर्यंत कसे असतील बाजारभाव?

दरम्यान एकूणच आगामी काळात कापसाचे भाव थोडेसे वाढू शकतात असा अंदाज स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत येणाºया बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्षातल्या तज्ज्ञांनी वर्तविली होती. मागच्या वर्षी 2023 मध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर 23 या काळात कापसाच्या किमती सरासरी 7075 रुपये प्रति क्विंटल होत्या. यंदा डिसेंबर 24 पर्यंत कापसाच्या किंमती 7500 ते 8500 रुपये प्रति क्विंटल असतील असा अंदाज बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षाने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *