परराज्यातून म्हैस खरेदी करताय? तर अनुदानात होणार इतक्या हजारांची वाढ, पहा सविस्तर ..

परराज्यातून म्हैस खरेदी करताय तर अनुदानात होणार इतक्या हजारांची वाढ, पहा सविस्तर ..

गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना पर राज्यातील म्हैस खरेदी अनुदानात पाच हजार रुपयांची वाढ केल्याची घोषणा संघाने अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली.  म्हैस दूध वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून दूध व्यवस्थापन संस्थांच्या म्हैस खर्च प्रति लिटर 80 पैसे वाढ करणार असून आता 2.20 रुपये मिळणार आहेत.

त्याचबरोबर शेतकऱ्यांना दूध फरका पोटी 104 कोटी रक्कम देणार असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले. गोकुळच्या 61 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.  अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हरियाणा येथून म्हैस खरेदीला आता तीस हजार तर गुजरात येथील म्हैस खरेदीसाठी 25 हजार रुपये अनुदान दिले जाते . त्यामध्ये पाच हजाराची वाढ करण्यात आली आहे.

वासाच्या दुधाला चांगल्या दुधाच्या तुलनेमध्ये कमी दर मिळत होता परंतु आता त्यामध्ये वाढ करण्याची भूमिका असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे असे अध्यक्ष ढोबळे यांनी सांगितले.

गोकुळची उलाढाल 3428 कोटी.. 

– उलाढाल ३,४२८ कोटी (गतवर्षी पेक्षा ४९९ कोटी)

– गाय दुधाचा खरेदी दर ३७.३६ रुपये तर म्हैस दुधाचा खरेदी दर ५५.०६ रुपये.

– १,६४० म्हैस परराज्यातून खरेदी.

– १ रुपये ८२ पैसे संघाकडे येणाऱ्या दुधाला परतावा देणार गोकुळ एकमेव.

– गाय दुधाला ५.१६ टक्के व म्हैस दुधाला ५.४२ टक्के दर फरक.

– दूध फरक, डिबेंचर व्याज, लाभांशापोटी १०४ कोटी

– दूध उत्पादकांना १७ कोटी ६० लाखांचे बायोगॅस योजनेतून अनुदान.

– म्हैस दुधाला संस्थांना व्यवस्थापन खर्चात प्रतिलीटर ८० पैशांनी वाढ करणार.

– गेल्या वर्षीपेक्षा प्रति दिन सरासरी १ लाख ४ हजार लीटरने विक्रीत वाढ.

– अहवाल सालात सेवा सुविधा व अनुदानापोटी १९ कोटी ८३ लाख दिले.

 

Leave a Reply