Kanda bajarbhav : आवक घटूनही दर कमीच; पुणे बाजारात कांद्याला कसा मिळाला बाजारभाव..

KAnda bajarbhav : रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये एकूण २४,२५१ क्विंटल कांद्याची नोंद झाली. यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक २०,२३६ क्विंटल इतकी होती, तर लाल कांद्याची आवक ४,०१५ क्विंटल नोंदवली गेली. उन्हाळी कांद्याला या दिवशी सरासरी ११०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. दुसरीकडे, लाल कांद्याचा सरासरी दर ९०० रुपये इतका होता. आवक […]

Yogi government : योगी सरकारचा साखर उद्योगासाठी मोठा निर्णय; महाराष्ट्राची मात्र पिछेहाट…

Yogi government : उत्तर प्रदेश सरकारने ऊस शेतकरी आणि साखर कारखान्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात 2027-28 पर्यंत ऊस उत्पादनात सात टक्के आणि गूळ उत्पादनात दहा टक्क्यांनी वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे राज्याच्या साखर उद्योगातील आर्थिक उलाढाल 1.62 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेचा उद्देश फक्त उत्पादनवाढ नसून, […]

Assam tea : ऐकावे ते नवलच ! आसामच्या शेतकऱ्यांनी विकला इतका कोटी किलो चहा…

आसाम आणि चहाचे देशातच नव्हे, परदेशातही अतूट नाते आहे. अशातच या शेतकऱ्यांनी यंदा चहा विक्रीचा नवा विक्रम केला आहे. तो विक्रम काय हे ते जाणून घेऊ! आसाममधील गुवाहाटी येथील चहा लिलाव केंद्राने (GTAC) चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या या आर्थिक वर्षात आतापर्यंत सुमारे 17 कोटी […]

Cotton growers : पंजाब सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांची उडणार झोप..

Cotton growers : राज्यात कापसाला चालना देण्यासाठी पंजाब सरकारने एक निर्णय घेतला असून त्यामुळे महाराष्ट्राती कापूस शेतकऱ्यांना विपरित परिणामांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. पंजाब सरकारने बी.टी. हायब्रीड कापसाच्या बियाण्यांवर ३३ टक्के अनुदान जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातील शेतकरी आणि बाजारपेठ याकडे लक्ष लागले आहे. पंजाबमध्ये जर कापसाची लागवड वाढली, तर देशात एकूण उत्पादनात वाढ होईल. […]

Wheat gram prices : पैशांची गरज आहे? गहू-हरभऱ्याला भावही मिळत नाही? मग हा उपाय करा..

Wheat gram prices : सध्या अनेक शेतकऱ्यांकडे गहू, हरभरा, ज्वारी, मका यांसारखे रब्बी हंगामातील पीकसाठा आहे. तसेच मागील खरीप हंगामातील सोयाबीनही अजून विकला गेलेला नाही. बाजारात दर कमी असल्यामुळे शेतकरी माल विक्रीबाबत संभ्रमात आहेत. अशा वेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची ‘शेतमाल तारण कर्ज योजना’ शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकते. या योजनेअंतर्गत माल गोदामात ठेवून त्यावर […]

Soyabin Rate : देशातील सोयाबीन शेतकऱ्यांना ब्राझील तंत्राचा लाभ होणार?

Soyabin Rate : सध्या देशात सोयाबीनचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी मिळत आहेत. अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ३५०० ते ४२०० रुपयांदरम्यान आहे, जे की शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत. यामुळे उत्पादन वाढूनही नफा न मिळाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचा नुकताच झालेला ब्राझील दौरा महत्त्वाचा मानला […]

Nafed onion : लासलगाव-पिंपळगावात नाफेडच्या कांदा चाळींना मिळणार नवे रूप…

Nafed onion : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नाफेडतर्फे लासलगाव आणि पिंपळगाव या दोन्ही ठिकाणी जुन्या कांदा गोडाऊनच्या दुरुस्तीबरोबरच नव्या चाळी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एकूण १२.२१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून सध्या टेंडर प्रक्रिया सुरू आहे. मागील अनेक वर्षांपासून नाफेडच्या कांदा गोडाऊन बंद अवस्थेत पडून होते. परिणामी, शेतकऱ्यांना कांद्याची साठवणूक […]

Heat wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम; पुढच्या आठवड्यात कसे असेल हवामान?

Heat wave : महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत मागील २४ तासांत तापमानात चढ-उतार दिसून आले. विदर्भ आणि मराठवाड्यात दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा थोडे अधिक असून हवामान उष्ण आणि दमट राहिले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागांत उष्णतेची लाट जाणवत आहे. तर देशाच्या ईशान्य भागात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान […]

Fisheries : ट्रम्प करामुळे आंध्रातील मत्स्यव्यवसाय डबघाईला; शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले..

Fisheries : अमेरिकेने भारतीय कोळंबी निर्यातीवर टेरिफ वाढवल्यानंतर आंध्रप्रदेशातील मत्स्यव्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे. कोळंबी उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून बाजारातील मागणीही कमी झाली आहे. परिणामी, हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत. अमेरिकेने अलीकडेच भारतीय कोळंबीवर टेरिफ १० टक्क्यांवरून २६ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा फटका भारताच्या कोट्यवधी रुपयांच्या समुद्री उत्पादने निर्यातीवर बसला आहे. यामध्ये […]

Wheat harvesting : राज्यात गव्हाची काढणी पूर्ण; देशात कुठल्या पिकाची कशी सुरू आहे काढणी? जाणून घ्या…

Wheat harvesting : भारतामध्ये रब्बी हंगाम 2024-25 दरम्यान गहू, तांदूळ आणि डाळींसारख्या मुख्य पिकांची लागवड चांगल्या प्रमाणात झाली असून काही राज्यांमध्ये या पिकांची काढणीही वेगाने सुरू आहे. कृषी मंत्रालयाच्या ४ एप्रिल २०२५ च्या अहवालानुसार सध्याच्या स्थितीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. गव्हाची लागवड ३२६.०६ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली असून ही मागील सरासरीपेक्षा अधिक आहे. देशात सध्या गव्हाच्या […]