Cotton Seeds : दर्जेदार कापूस बियाणे लवकरच शेतकऱ्यांना मिळणार स्वस्तात..

सध्या कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना महागड्या किंमतीत घ्यावे लागत असून पावसाने ओढ दिल्यास त्यांच्यापुढे दुबार पेरणीचे संकट येते. त्यातून त्यांचा खर्च वाढतो. मात्र या सर्वांवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने आयसीएआरच्या शास्त्रज्ञांना सूचना केल्या असून आगामी काळात कपाशीचे स्वस्त आणि दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना मिळू शकते. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कापसाच्या बियाण्यांच्या उच्च किमतीबद्दल चिंता व्यक्त […]

Tur Kid : ढगाळ वातावणामुळे तुरीवर आलीय कीड, असा बंदोबस्त करा..

Tur Kid : सध्याच्या ढगाळ वातावरणामध्ये तूरीवर शेंगा पोखरणा-या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तसेच शेंगमाशीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास तुरीमध्ये अडकण होऊ शकते. त्याकरिता खालील प्रमाणे किडीचे व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन वनापकृ विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञांनी केले आहे. शेंगा पोखरणारी अळी (हेलिकोवर्पा)चा असा करा बंदोबस्त: पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. हेलिकोवर्पा […]

Onion price : खराब झालेल्या कांद्यामुळे उत्पादन घरसले आणि बाजारातील भावही घसरले..

onion price : दिवाळीआधी झालेल्या अवकाळी पावसाने नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काढणीच्या वेळी खरीप व लेट खरीप कांदा खराब निघत आहे. त्यामुळे एकरी ७० क्विंटल ऐवजी अनेक शेतकऱ्यांना एकरी २० ते ३० क्विंटल इतकेच लाल कांदय्ाचे उत्पादन निघत आहे. त्यामुळे सध्या बाजारात भाव सरासरी इतके असूनही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मागील तीन […]

Silk agriculture : या पिकाला बाजारात सध्या एका क्विंटलचे मिळतात ७० हजार रुपये…

Silk agriculture : शेती करताना प्रयोगशील शेतकरी वेगवेगळ्या पिकांचा पर्याय शोधून काढतात. कारण त्यांना चांगला बाजारभाव आणि चांगले उत्पन्न अपेक्षित असते. मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी असाच एक पर्याय शोधला असून सध्या ते त्यातून लाखोंची कमाई करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री तालुक्यांसह जालना जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये असंख्य शेतकरी मागील काही वर्षांपासून रेशीम शेतीकडे वळाले आहेत. […]

Sugarcane FRP : ऊसाची एफआरपी मिळण्यात अडचण येणार? कारखानदारांच्या ‘प्रतापामुळे’ साखर घसरली..

Sugarcane FRP :सध्या जास्त भाव देणाऱ्या कारखान्याला ऊस देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चढाओढ लागली आहे. दुसरीकडे साखर कारखानेही ऊसाचे गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऊसाची पळवापळवी करताना दिसत आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली असून त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपीसह ऊस दरावर परिणाम होऊ शकतो. होय हे खरे आहे आणि त्याचा फटका थेट राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार […]

devendra Fadnavis Chief Minister : नवे सरकार शेतीसाठी काय करणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले.

devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यात त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी आगामी काळात राज्य सरकार काय कामे करणार याची थोडक्यात माहिती दिली. महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, […]

Maharashtra Weather and rain update : पुढील तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरणाचे सावट, या ठिकाणी पाऊस होणार..

राज्यात मागील दोन दिवसांपासून थंडीसह अनेक भागात धुके आणि ढगाळ वातावरण होते. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास नाशिकसह अनेक ठिकाणी हलका पाऊस पडल्याचे वृत्त आहे. राज्यात येणाऱ्या काळात कसे असेल हवामान ते जाणून घेऊ. तमिळनाडू राज्यात घुसलेले ‘ फिंजल ‘ चक्रीवादळ भू-भागावरच क्षीणतेकडे झुकल्यामुळे कर्नाटक राज्य ओलांडून जरी त्याचे अवशेष अरबी समुद्रात प्रवेशले, तरीदेखील ते तीव्र होवू […]

Grain storage scheme : जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्राचाही समावेश..

Grain storage scheme : सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेच्या प्रायोगिक प्रकल्पांत महाराष्ट्र राज्याचाही समावेश असून सहकारी विकास सोसायट्या अर्थात पॅक्स किंवा प्राथमिक कृषी पतसंस्था यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. त गाव पातळीवर ही गोदामे असणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना धान्य साठविण्यासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, […]

Rabi krishi salla : बागायती गव्हाची पेरणी उरका १५ डिसेंबरपर्यंत, रब्बी ज्वारीची अशी घ्या काळजी..

सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकावर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी पावसाची उघाड बघून किटकनाशकाची फवारणी करावी अशी शिफारस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने केली आहे. तज्ज्ञांनी आठवड्यासाठी पुढीलप्रमाणे पीक व्यवस्थापनाचा सल्ला दिला आहे. कापूसवेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. […]

Grape farming : अवकाळी पावसाने नाशिकमधील द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान

आज पहाटेच्या दरम्यान नाशिकच्या द्राक्षपट्यात सुमारे दोन तासांहून अधिक पाऊस झाल्याने द्राक्षबागांना त्याचा फटका बसला आहे. निफाड तालुक्यातील उगाव, रानवड, निफाड, वनसगाव, शिवडी यासह परिसरातील गावांमध्ये दिनांक ५ नोव्हेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास पावसाला सुरूवात होऊन सुमारे दोन ते अडीच तास पाऊस सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पावसाने परिसरातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले […]