Havaman andaj : आता ग्रामपंचायत सांगणार हवामान अंदाज; महावेधला मुदतवाढ..

*Havaman andaj :  राज्यातील प्रत्येक गावात हवामानाची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारच्या महावेध प्रकल्पास पुढील पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली असून, यामुळे गावागावात हवामान निरीक्षण शक्य होणार आहे. हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही त्यांच्या शेताच्या […]

Kharif sowing : राज्यात आतापर्यंत खरीपाच्या ८ टक्के पेरण्या..

Kharif sowing : राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करुन ठेवा. गरज भासल्यास आणखी मागणी करण्यात यावी, […]

Maharashtra rain update : राज्यातील ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यातही मॉन्सून सक्रीय..

Maharashtra rain update : महाराष्ट्रात जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागांमध्ये वाऱ्याचा वेगही अधिक असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यासाठी पीक व्यवस्थापन करताना काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली […]

Artificial intelligence : आता शेतकऱ्यांच्या मदतीला कृत्रिम बुद्धिमत्ता; राज्याचं नवं धोरण जाहीर…

artificial intelligence : महाराष्ट्र शासनाने शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी 2025 ते 2029 या कालावधीसाठी ‘महाॲग्री-एआय’ धोरण मंजूर केलं आहे. या धोरणामुळे शेतकऱ्यांना हवामान, पीक सल्ला, बाजारभाव, रोगराई नियंत्रण आणि सरकारी योजनांची माहिती मराठीतून थेट मिळू शकेल. या धोरणाअंतर्गत मोबाइल अ‍ॅप, आवाजावर आधारित सहाय्यक, चॅटबॉट्स यांचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवली जाईल. शेतकऱ्यांच्या शेतीसंदर्भातील सर्व […]

kanda bajarbhav : कांदा बाजारभावात घसरण; या बाजारात केवळ १०० रुपये, मात्र पुढे वाढणार..

kanda bajarbhav : पावसामुळे बाजारात ओला कांदा येत आहे. चांगल्या दर्जाचा कांदा कमी असल्याने ओला कांदा आणि कमी दर्जाचा कांदा यांना या आठवड्यात तुलनेने कमी भाव मिळत आहे. त्याचा परिणाम राज्याच्या सरासरी बाजारभावावर झालेला आहे. येणाऱ्या काळात ओला कांदा आवक कमी झाल्यास चांगल्या कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. काल १७ जून रोजी राज्यातील कांदा […]

Turmeric Research Center : हिंगोलीतील हळद संशोधन केंद्र देणार शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान…

Turmeric Research Center : हळद पिकाचा जास्त फायदा शेतकऱ्यांना व्हावा, त्यांना नवे तंत्रज्ञान मिळावे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अलीकडेच एक बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना आधुनिक आणि कमी खर्चात हळद उत्पादनासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान उपलब्ध करून […]

Monsoon update : मान्सून पुढे सरकला, परंतु पावसाचा जोर कोकणातच..

maharashtra rain update:  राज्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असताना आता मान्सून अखेर पुढे सरकला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून स्थिरावलेला हा पावसाळी प्रवाह आता नाशिक, नगर, संपूर्ण खान्देश, मराठवाडा आणि विदर्भासह राज्याच्या बहुतांश भागांत पोहोचला आहे. मात्र, मान्सून जरी महाराष्ट्र व्यापला असला तरी अजूनही त्याच्या प्रवाहात हवा तसा जोर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर […]

River levels : जगबुडीची पातळी धोक्याच्यावर, तर गोदावरीसह काही नद्यांत विसर्ग सुरू..

River levels : सोमवार दिनांक १६ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत राज्यात पूरस्थिती संदर्भातील विविध विभागांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार काही नद्या आणि बंधाऱ्यांमध्ये पाण्याची पातळी वाढत असून, काही ठिकाणी नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पातळी ७ मीटरच्या धोक्याच्या पातळीच्या वर गेली आहे. ही एकमेव नदी सध्या धोकादायक […]

Vegetable export : देशातून शेती उत्पादनांची निर्यात वाढतेय, भात, मसाले, फळे-भाजीपाला निर्यातीचा सकारात्मक कल..

Vegetable export : मे २०२५ आणि एप्रिल-मे २०२५ या कालावधीत भारताच्या शेतीसंबंधित निर्यातीचा वेध घेतला असता, शेतमाल प्रक्रिया उद्योग, भात, मसाले, चहा, कॉफी, फळे आणि भाजीपाला यांची निर्यात वाढत असल्याचे स्पष्ट होते. ही माहिती केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे. मे २०२५ मध्ये केवळ भाताची निर्यात ९६७.०४ दशलक्ष डॉलर झाली, […]

Onion purchase : नाफेडकडून कांदा खरेदीसाठी हा भाव जाहीर; लवकरच होणार खरेदी..

Onion purchase : उन्हाळी कांद्याच्या खरेदीसाठी नाफेडने आता अधिकृत बाजारभाव जाहीर केले असून, त्यामुळे रखडलेली कांदा खरेदी प्रक्रिया आता या आठड्यात सुरु होणार आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार ९ जून २०२५ रोजी प्रत्येक क्विंटलसाठी १४३५ रुपये इतका हमीखरेदी दर निश्चित करण्यात आला आहे. या दरानुसार शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी सुरू करण्याचे आदेश संबंधित एजन्सींना […]