Railway reservation : आता आधारकार्ड जोडले तरच मिळणार रेल्वेचे रिझर्वेशन..

Railway reservation : प्रवाशांच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर होईल असा निर्णय रेल्वेने घेतला असून आता रिझर्वेशनसाठी आधारकार्ड जोडणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार कमी होऊन अनेक शेतकऱ्यांना तीर्थयात्रा आणि नित्य कामांसाठी आता आरक्षण मिळणे सोपे होणार आहे. तात्काळ तिकिटांची निष्पक्ष आणि पारदर्शक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांचे हित जपण्यासाठी भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट […]
Monsoon update : मान्सूनचा वेग वाढतोय; महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता..

Monsoon update : भारतीय हवामान खात्याने आज १२ जून रोजी सकाळी ८:१५ वाजता दिलेल्या माहितीनुसार देशात नैर्ऋत्य मान्सूनचा वेग वाढत असून तो आता मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भुवनेश्वर, पुरी आणि बालूरघाटपर्यंत पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत हा मान्सून विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि मध्य भारतात आणखी भागांत सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून अधिक सक्रिय होईल, […]
Onion price : राज्यात कांद्याची मोठी आवक, दरात थोडीशी घट…

Onion price : बुधवार दिनांक ११ जून २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांदा आणि लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक नोंदवण्यात आली. परिणामी दरात काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ११ जून रोजी राज्यभरात उन्हाळी कांद्याची एकूण २ लाख ९७ हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक झाली असून, लाल कांद्याची एकूण आवक सुमारे ३५ हजार क्विंटलच्या […]
Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास ‘ए ग्रेड’मानांकन…

Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीने प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकन प्रदान केले आहे. ही अधिस्वीकृती १ एप्रिल २०२३ पासून ३१ मार्च २०२८ या कालावधीसाठी पाच वर्षांसाठी देण्यात आली असून, विद्यापीठास ३.२१ गुण मिळाले आहेत. आयसीएआरच्या १६ मे २०२५ रोजी पार पडलेल्या […]
Onion cultivation : कांदा पिकासाठी शेतकऱ्यांनी कोणते बियाणे वापरावे? ‘प्रमाणित’ की ‘सत्यप्रत’?

Onion cultivation : कांदा हे अतिशय नाजूक आणि बाजारभावाच्या चढ-उतारावर चालणारे पीक असल्यामुळे याच्या उत्पादनासाठी निवडले जाणारे बियाणे सर्वोत्तम दर्जाचे असणे अत्यावश्यक आहे. पण शेतकऱ्यांपुढे एक मोठा प्रश्न कायम असतो – कांद्याच्या पेरणीसाठी ‘प्रमाणित बियाणे’ वापरावे की ‘सत्यप्रत बियाणे’? प्रमाणित बियाणे हे सरकारच्या अधिकृत देखरेखीखाली विशेष पद्धतीने तयार केले जाते. यामध्ये उत्पादनासाठी विशिष्ट स्रोत बियाण्यांचा […]
Cotton intercropping : कापसाबरोबर घ्या आंतरपीक; असे करा पेरणीपूर्व नियोजन..

Cotton intercropping : शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा कृषि हवामान आधारीत सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतून प्रसिद्ध करण्यात आला आहे. पेरणीस योग्य स्थिती निर्माण होईपर्यंत कोणतीही घाई न करता शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, असे विद्यापीठाच्या तज्ञांनी स्पष्ट केले आहे. जमिनीत वापसा स्थिती येण्यासाठी किमान ७५ ते १०० मिमी पावसाची […]
Kharif sowing : खरीपाच्या पेरण्या करा १५ जूननंतरच; या तारखेला मॉन्सून होणार सक्रिय..

Kharif sowing : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक […]
Kharif season : खरिप हंगामात सोयाबीन, कापूस, ज्वारी आणि तुरीचे वापरा सुधारित बियाणे..

Kharif season : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय कृषि उपक्रम (NICRA) व कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती (RIFS) अंतर्गत मौजे उजळांबा, बाभुळगाव, सोन्ना, आडगाव (जि. परभणी) येथे संशोधनात्मक पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातर्फे खरीप हंगाम नियोजनासाठी शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात […]
kanda bajarbhav : बाजारातील आवक उतरणीला; कांदा बाजारभाव वाढले..

Onion prices increased : मागच्या सोमवारच्या तुलनेत या सोमवारी म्हणजेच आठवड्याची सुरुवात होताना दिनांक ९ जून रोजी कांद्याची राज्यातील आवक घसरलेली दिसत आहेत. तर भावही स्थिर असल्याचे दिसून येत आहे. मागच्या सोमवारी राज्यात सुमारे ४ लाख क्विंटलपेक्षा जास्त कांदा आवक होती, तर या सोमवारी ती अवघी २ लाख ७५ हजार क्विंटल इतकी आहे. जून महिन्यात […]
Nafed Kanda Kharedi : कांदा उत्पादकांसाठी नाफेडची नोंदणी सुरू, लवकरच कांदा खरेदी सुरू होणार..

Onion rate : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच नाफेड आणि एनसीसीएफतर्फे कांदा खरेदी सुरू होणे अपेक्षित असताना त्यानंतर दोन महिने उलटून जून उजाडला तरी शेतकऱ्यांना नाफेड कांदा खरेदी करेल किंवा नाही याची शाश्वती वाटत नव्हती. दरम्यान आता मात्र नाफेडकडून शेतकऱ्यांना कांदा खरेदीची दिलासादायक बातमी आहे. काल दिनांक ९ जूनपासून नाफेडच्या संकेतस्थळावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नोंदणीची लिंक प्रसिद्ध […]