first solar energy : पोफळा’ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम…

first solar energy

first solar energy : पर्यावरण संवर्धनाचा एक आयाम शून्य कार्बन उत्सर्जन हा ही आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जेचा वापर अधिकाधिक होणे आवश्यक आहे. शासन त्यास चालना देत आहेच. ह्या संकल्पनेचे महत्त्व जाणून आजच कृतिशील पावले उचलणाऱ्या संस्थाही आहेत. त्यापैकीच एक एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस लि. या संस्थेने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा विनियोग करुन फुलंब्री तालुक्यातील पोफळा हे गाव […]

monsoon season : पावसाळ्यात पशुधनाच्या गोठ्याचे व्यवस्थापन व आहारात बदल गरजेचा…

monsoon season

monsoon season : राज्यात मागील दोन दिवसापासून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे इशारे आहेत. अशा स्थितीत पशुधनासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे, कारण या काळात जनावरांच्या आरोग्यावर व गोठ्याच्या संरचनेवर मोठा परिणाम होतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला गोठ्यात गळती होणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यावी. छत व भिंतीची दुरुस्ती करून पाणी आत […]

Sugarcane field : ऊस शेतीत क्रांती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर; बारामती पॅटर्न राज्यभर विस्तारणार..

Sugarcane field : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि आशादायी पाऊल उचलण्यात आले आहे. बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने (एडीटी) कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस शेतीत यशस्वी प्रयोग केले आहेत, ज्याची दखल आता राज्यव्यापी स्तरावर घेतली जात आहे. नुकताच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) आणि बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यात एक सामंजस्य करार […]

Rain forecast : महाराष्ट्रात १२ जूनपासून जोरदार पावसाचा अंदाज!

Rain forecast : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! गेल्या काही दिवसांपासून पुण्या-मुंबईत रखडलेला मान्सून येत्या गुरुवार, १२ जूनपासून पुन्हा सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे (IMD पुणे) निवृत्त हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ते १६ जून या पाच दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः, १४ ते १६ […]

Cloudy weather : सावधान, ढगाळ हवामानात रोगराईची शक्यता वाढली; द्राक्ष व डाळिंबाची अशी घ्या काळजी..

Cloudy weather : सद्याच्या पावसाळी हवामानामुळे आर्द्रता वाढणार असून याचा थेट परिणाम बागायत क्षेत्रात, विशेषतः द्राक्ष व डाळिंब पिकांवर दिसून येतो. त्यामुळे या पिकांमध्ये विविध बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मोठी आहे. द्राक्ष बागांमध्ये वाढलेली आर्द्रता आणि ढगाळ हवामान यामुळे “अ‍ॅन्थ्रॅक्नोज” (बुरशीजन्य करपा) आणि “बॅक्टेरियल लीफ स्पॉट” यासारख्या रोगांची तीव्रता वाढते. यावर नियंत्रण […]

Kharif season : खरीप हंगामातील पिकांसाठी अशी सुरू करा पूर्वमशागत..

Kharif season : लवकरच काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होईल, आणि खरीप हंगामाच्या सुरुवातीसाठी हे हवामान अतिशय अनुकूल ठरेल. कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ ते २४ अंश दरम्यान राहणार आहे. त्यामुळे उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण पेरणीपूर्व मशागतीस पूरक असेल. खरीप पिकांत भात, बाजरी, नाचणी, सोयाबीन, उडीद, मुग, […]

Vegetable cultivation : भाजीपाला लागवडीस सध्याचे हवामान योग्य; असे करा नियोजन..

Vegetable cultivation : नाशिक जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात ७ ते ११ जून २०२५ दरम्यान हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या कालावधीत आकाश मुख्यतः अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान ३५-३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३-२४ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग ११ ते १८ किमी प्रतितास असण्याची शक्यता असून काही भागांत […]

Tractor demand : देशात इतर वाहनांच्या तुलनेत ट्रॅक्टरची मागणी वाढली..

Tractor demand : देशात शेतकरी वर्गाची गरज, पेरणीचा हंगाम आणि सुधारलेली शेती यंत्रणा यामुळे सध्या ट्रॅक्टर खरेदीला मोठी चालना मिळत आहे. एकीकडे कार, दुचाकी आणि इतर खासगी वाहने बाजारात स्थिरतेचा अनुभव घेत असताना, ट्रॅक्टर क्षेत्र मात्र वेगाने पुढे जात आहे. याचे कारण म्हणजे थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेतील सक्रियता, पावसाचा चांगला अंदाज आणि सरकारच्या शेतीविषयक धोरणांचा सकारात्मक […]

PM-Kisan : पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; या दिवशी जमा होणार?

PM-Kisan : शेतीवर अवलंबून असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता लवकरच म्हणजे जून 2025 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना लवकरच 2,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी […]

Weather update : राज्यात काही भागात मॉन्सून लवकरच सक्रीय होण्याची चिन्हे..

weather update : महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल हळूहळू पुढे सरकत असून ९ जून रोजी मिळालेल्या हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे, मान्सून सध्या मुंबई, अहल्यानगर, आदिलाबाद, भुवनेश्वर आणि पुरी या मार्गाने सरकतो आहे. खान्देश, नाशिक व विदर्भातील व उत्तरेकडील जिल्ह्यात अजून मान्सून पोहोचलेला नाही. कोकण आणि मुंबई परिसरात मान्सून पोहोचला असून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागांत लवकरच […]