बिपरजॉय वादळ गुजरात मध्ये धडकलं, १५० किमी ताशी वेग, एक लाख लोकांचं स्थलांतर, वाचा संपूर्ण परिस्थिती.

बिपरजॉय वादळ गुजरात मध्ये धडकलं, १५० किमी ताशी वेग, एक लाख लोकांचं स्थलांतर, वाचा संपूर्ण परिस्थिती.

अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय  चक्रीवादळ काल संध्याकाळी गुजरातच्या जखाऊ बंदराला धडकले यावेळी 150 किलोमीटर प्रतितास इतका होता .बिपरजॉय  चक्रीवादळ  15 किलोमीटर या वेगाने पुढे सरकत असल्याचे तज्ज्ञांनी  सांगितले.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सौराष्ट्र आणि कच्छ भागात  वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सावधानतेचा इशारा दिलेला आहे .बिपरजॉय  चक्रीवादळ  हे मागील दहा दिवसापासून गुजरातच्या दिशेने वेगाने सरकत होते. चक्रीवादळ हेजखाऊ बंदरापासून 70 किलोमीटर दूर समुद्रात होते. समुद्रापासून वादळ पूर्णपणे जमिनीवर सरकण्यास किमान चार तास लागतील असा अंदाज भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला आहे . हे वादळ श्रेणी-३ मधील आहे. चक्रीवादळाचा केंद्रबिंदूची रुंदी ही 50 किलोमीटर असून हे चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने सरकताना वाऱ्याचा वेग वाढत जाईल. देवभूमी. द्वारका कच्छ .जामनगर राजकोट .पोरबंदर जुनागड. या जिल्ह्यामध्ये  मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

गुजरात सरकारने सुमारे एक लाखाहून  अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे .गुजरातच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला गुजरातच्या आठ जिल्ह्यांमध्ये जारी अलर्ट करण्यात आलेला आहे एनडीआरएफच्या 18 आणि एसडीआरएफच्या 12 तुकड्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.  हे चक्रीवादळ पोरबंदरापासून दूर सरकले असून द्वारका देवभूमी ,द्वारका आणि कच्छच्या किनारी भागाकडे सरकत आहे. यामुळे काही ठिकाणी जोरात वारे वाहत असून काही ठिकाणी  जोरात पाऊस पडत आहे .बारा हजाराहून अधिक विजेचे खांब देखील कोसळलेले आहे अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे. 

गुजरात नंतर बिपरजॉय  ची वाटचाल राजस्थानच्या दिशेने

 बिपरजॉय चक्रीवादळ काल रात्री साडे अकराच्या सुमारास गुजरातच्या जखाऊ बंदराला  धडकले   या चक्रीवादळामुळे कच्छ, जाखाऊ आणि मांडवी मध्ये अनेक झाडे पडलेले असून विजेच्या तारा खांब हे देखील पडलेले आहे. या घटनांमुळे 22 जण जखमी झालेले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत तसेच गुजरात पोलीस आणि बचाव दल पडलेले खांब   तुटलेल्या तारा ,झाडे हटवण्याचे काम सुरू आहे. आता गुजरात नंतर बिपरजॉय  ची वाटचाल राजस्थानच्या दिशेने होत आहे. 

Leave a Reply