सध्या कांद्याला दर नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे परंतु महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणामध्ये चांगला दर मिळत आहे .
कांदयाला महाराष्ट्र मध्ये दर नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ आलेली आहे. त्याच कांद्याला तेलंगणा सरकार चांगला दर देत आहे .तेलंगणा सरकारच्या हमीभाव कायद्यामुळे हा चांगला भाव देऊ शकले आहे.
कष्टाने पिकवलेला कांद्याला कवडी मोलाचाही भाव मिळाला नाही यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे त्याच्यावर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकरी विविध ठिकाणी आंदोलन देखील करत आहे. तेलंगणाच्या हैदराबाद मधील बाजारपेठेत कांद्याला चांगला बाजार भाव मिळत आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी थेट तेलंगणाला कांदा विक्री करणे पसंत करत आहेत.
तेलंगणामध्ये किती मिळतोय कांद्याला भाव
महाराष्ट्र मध्ये प्रतिक्विंटल 400, 500 ,ते 700, रुपये दर मिळत आहे यामध्ये शेतकऱ्याचे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही परंतु याच्या तुलनेत तेलंगणामध्ये शेतकऱ्यांच्या याच कांद्याला तब्बल १९०० रुपये प्रतिक्विंटल असा तर मिळत आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या चारपट दर तेलंगणामध्ये मिळत आहेत .