Lasalgaon Vinchoor : बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र असल्याने राज्यातील अनेक बाजारसमित्यांना सुटी जाहीर झाली आहे. त्यामुळे कांद्यासह भाजीपाल्याचे लिलाव होणार नसल्याचे समित्यांच्या व्यवस्थापनाने कळवले आहे.
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलावासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव विंचूर उपबाजार समितीसह जिल्ह्यातील अनेक बाजारांना महाशिवरात्रीनिमित्त सुटी आहे. त्यामुळे उद्या बुधवारी कांदा लिलाव होणार नाहीत. तसेच भुसार, तेलबिया आणि शेतमालाचे लिलावही बंद राहणार आहे. याशिवाय राज्यातील अनेक बाजारसमित्यांमधील लिलाव उद्या होणार नसल्याचे समजते.
लासलगाव बाजारसमितीने काय केले आवाहन
लासलगाव विंचूर बाजारसमितीने केलेल्या आवाहनानुसा उद्या बुधवार दि. 26/02/ 2025 रोजी महाशिवरात्री असल्याने विंचूर उपबाजार आवारावरील कांदा,भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव बंद राहतील.
दरम्यान परवा गुरुवार दि. 27/02/ 2025 रोजी कांदा या शेतीमालाचे लिलाव दोन्ही सत्रात होतील. तसेच भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव फक्त सकाळच्या सत्रात सुरू राहतील. दुपारच्या सत्रात भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव बंद राहतील.












