शेतकऱ्यांसाठी सरकारने केली नवीन सेवा सुरू, कसा फायदा घ्यायचा? जाणून घ्या सविस्तर ..

शेतकऱ्यांसाठी सरकारने केली नवीन सेवा सुरू ..

केंद्र सरकारने पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.आता फक्त त्यांचा चेहरा स्कॅन करून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास अनुमती सरकारने दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांसाठी केवायसी पूर्ण करण्याच्या सरकारच्या ध्येयाचा एक भाग म्हणून ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांसाठी केवायसी अनिवार्य

लाभार्थी शेतकऱ्यांसाठी केवायसी करणे केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार आवश्यक आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळण्यासाठी केवायसी लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.जर एखाद्या शेतकऱ्याने ई-केवायसी  पूर्ण केलेले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावेत.

 ई-केवायसी पडताळणीसाठी आत्तापर्यंत फक्त ओटीपी किंवा फिंगरप्रिंटचा पर्याय उपलब्ध होता. ज्या शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे जास्त कामामुळे खराब झालेले आहेत. असे शेतकऱ्यांना हे आव्हान ठरू शकते. नवीन चेहरा स्कॅन वैशिष्ट्यसह ते आता त्यांचीही केवायसी प्रक्रिया सहजपणे पूर्ण करू शकतात.

चेहरा ओळखणे कसे कार्य करते

चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान हे आता पीएम किसन मोबाईल ॲप वर उपलब्ध आहे. हे वापरण्याकरता ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आधार क्रमांकावरून आय रिस डेटा वापरण्याची परवानगी देते.

पी एम किसान योजना म्हणजे काय

पी एम किसान योजना ही जगातील सर्वात मोठ्या डी पी टी योजनेपैकी एक आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये थेट तीन महिन्यांमध्ये प्रति वर्ष सहा हजार रुपये मिळतात तीन कोटीहून अधिक महिलांसह अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना एकूण 2.42 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *