Monsoon update : आज मॉन्सून केरळात प्रवेशाची शक्यता, महाराष्ट्रातही लवकरच आगमन..

Monsoon update : पावसाळ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, नैर्ऋत्य मान्सूनने आपली वाटचाल सुरू केली असून येत्या २४ तासांत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याने, महाराष्ट्रातही तो वेळेत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या मान्सून कुठे पोहोचला आहे?मान्सूनची उत्तर मर्यादा सध्या ५ […]

QR Code : बियाणांच्या बॅगांवरील ‘क्यूआर कोड’चा शेतकऱ्यांना उपयोग काय ,जाणून घ्या सविस्तर …

QR Code : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना बियाणांबाबत शास्त्रीय आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळावी म्हणून सर्व बियाणांच्या बॅगांवर क्यूआर कोड बंधनकारक केला आहे. याचा उद्देश शेतकऱ्यांना बियाणे आणि पिकांच्या व्यवस्थापनाची माहिती सहज उपलब्ध करून देणे हा आहे. ➡️ क्यूआर कोडची विद्यमान समस्या मात्र, सध्या काही क्यूआर कोड स्कॅन होत नाहीत, तर काही ठिकाणी कोड स्कॅन झाल्यास जाहिराती दाखवल्या […]

pesticide testing laboratory : नाशिकची कीटकनाशक तपासणी प्रयोगशाळा शासनाकडून रद्द…

pesticide testing laboratory

pesticide testing laboratory : मोठा गाजावाजा करत नाशिक जिल्ह्यात मंजूर केलेली किटननाशक अंश तपासणी प्रयोगशाळा आता रद्द झाली आहे. दि. १४ मे २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने नाशिक जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या कीटकनाशक अंश तपासणी प्रयोगशाळेच्या प्रकल्पाला दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. या निर्णयामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांमध्ये, विशेषतः द्राक्ष, डाळिंब, कांदा आणि भाजीपाला उत्पादकांमध्ये, निराशा पसरली आहे. […]

Weather warning : सावधान ! राज्यात शनिवारपर्यंत अवकाळीचा इशारा; मात्र पेरणीची घाई नको..

Weather warning : महाराष्ट्रात गुरुवार २२ मेपासून ते शनिवार २४ मेपर्यंत अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसाचा सर्वाधिक प्रभाव दुपारनंतर जाणवण्याची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील व विजांच्या कडकडाटासह पावसाचे सत्र सुरू राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी […]

Crop care : यंदा कापूस, तुरीची लागवड करण्यापूर्वी ही काळजी घ्याच..

Crop care : लवकच खरीपाचा हंगाम सुरू होत असून कापूस, तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. कापूस पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. हलक्या तसेच […]

Sugarcane farming : आता राज्यात होणार एआयच्या मदतीने ऊस शेती; टनेज वाढणार..

Sugarcane farming : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंददायक बातमी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT) च्या ‘फार्म ऑफ द फ्युचर’ प्रकल्पाने एआयच्या साहाय्याने ऊस उत्पादनात 40% वाढ साधली आहे, तसेच पाण्याचा वापर अर्ध्यावर आला आहे आणि खतांची गरजही कमी झाली […]

Farm road records : शेतकऱ्यांना दिलासा; आता शेतरस्त्यांच्या नोंदी ७/१२ उताऱ्यावर अनिवार्य..

Farm road records : शेतरस्त्यांची नेहमीच समस्या येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी आहे. शेतीतील वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेतरस्त्यांची गरज अधिक तीव्र झाली असून, पारंपरिक पायवाटा किंवा बैलगाडी रस्ते आजच्या आधुनिक कृषी उपकरणांसाठी अपुरे पडत आहेत. ही गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता शेतरस्त्यांची अधिकृत नोंद थेट ७/१२ उताऱ्याच्या “इतर हक्क” सदरात करण्याचे […]

farmers in Marathwada : जालना येथील प्रस्तावित सीड पार्क रद्द : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा धुळीला…

farmers in Marathwada

farmers in Marathwada : मराठवाड्यात सीड हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना परिसरात होणाऱ्या संभाव्य सीड पार्कची मान्यता रद्द करण्यात आली आहे. २० मे २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने जालना येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रस्तावित असलेला “महाबीज सामान्य सुविधा केंद्र” हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ‘सीड हब’ म्हणून ओळख मिळवलेल्या जालना जिल्ह्याच्या विकासाला […]

Kanda bajarbhav : नाफेड कांदा खरेदी सोमवारपासून सुरू होणार? काय मिळणार बाजारभाव..

*Nafed Kanda Kharedi : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा बाजारात भाव कोसळले असून मागच्या दोन आठवड्यापूर्वी तर १ हजाराच्या खाली गेले होते. मात्र दहा दिवसांपासून त्यात दोन ते तीन रुपयांची सुधारणा होऊन ते पुन्हा सरासरी १ हजार (राज्याची सरासरी) रुपये प्रति क्विंटलपर्यंत आले आहेत. अशातच मागील पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाने कांदा पिकासह अनेक पिकांचे नुकसान […]

Export onion & wheat : कांदा निर्यातशुल्क हटविल्यानंतर आता गव्हावरील निर्यातबंदी हटविण्याची मागणी…

Export onion & wheat

Export onion & wheat : देशात यंदा गव्हाचे उत्पादन भरघोस झाले असून, सरकारच्या खरेदीचेही उच्चांक मोडले जात आहेत. अनुकूल हवामान, योग्य वेळी पाऊस, रोगरहित पीक आणि सुधारित बियाण्यांमुळे यंदाचा गहू उत्पादनाचा हंगाम विक्रमी ठरणार आहे. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार यंदा 115.43 दशलक्ष टन गहू उत्पादन होणार आहे. तर अमेरिकेच्या कृषी विभागाने हा अंदाज 117 दशलक्ष टन […]