Evaporation : वाढत्या बाष्पीभवनामुळे पिकांना पाण्याची गरज वाढली; तज्ज्ञांचा सल्ला वाचाच…

Evaporation : वाढत्या तापमानामुळे आणि बाष्पोत्सर्जनाच्या वेगाने शेतातील पीक, फळबागा, भाजीपाला आणि फुलपिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भासत आहे. याच पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने शेतकऱ्यांसाठी हवामानाधारित कृषि सल्ला जारी केला आहे. पीक व्यवस्थापन:काढणी झालेल्या हळद पिकाचे उकडणे, वाळवणे आणि पॉलीश करून साठवणूक गोदामात करावी. उन्हाळी भुईमूग […]
hybrid-cows & goats : संकरित गाईंची अशी घ्या काळजी; शेळ्यांसाठीही करा हे उपाय…

hybrid-cows & goats : उन्हाळ्यात उष्णतेचा जास्त त्रास गाई-म्हैस, शेळी आणि इतर जनावरांना होतो. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडू शकते, दूध कमी होऊ शकते, आणि प्रजनन क्षमताही कमी होते. हे टाळण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांनी उन्हाळ्यात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कृषी आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. गाई आणि म्हशींची काळजी कशी घ्यावी?:संकरीत गाई […]
Grape damage : द्राक्ष ‘खरड छाटणी’ योग्य पद्धतीने करा, अन्यथा होईल नुकसान…

Grape damage : द्राक्ष बागेची योग्य वाढ, एकसंध फुटी आणि पुढील उत्पादन चांगले यावे यासाठी खरड छाटणी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. या छाटणीची योग्य पद्धत वापरली नाही, तर पुढे उत्पादनावर परिणाम होतो आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं, असा सल्ला इगतपुरी येथील महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी हवामान विभागाने दिला आहे. खरड […]
farmers Special facility : पुणे स्थानकावर शेतकरी आणि सामान्य प्रवाशांसाठी गर्दीच्या प्रवासासाठी ‘ही’खास सोय…

farmers Special facility : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुणे रेल्वे स्थानकावर वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक खास ‘विश्रांती मंडप’ उभारला आहे. हा मंडप फलाट क्रमांक १ जवळच्या व्हीआयपी साइडिंग भागात तयार करण्यात आला असून, प्रवाशांना थांबण्यासाठी ही सुरक्षित आणि आरामदायक जागा उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामागचा उद्देश असा आहे […]
Summer peanuts : उन्हाळी भुईमुगासाठी ‘हे’ तंत्र वापरा; पाणी लागेल कमी आणि उत्पादन वाढण्याची हमी..

Summer peanuts : उन्हाळी भुईमुग पिकाच्या योग्य वाढीसाठी व उत्पादनवाढीसाठी तुषार सिंचन ही आधुनिक आणि परिणामकारक सिंचन पद्धत ठरत आहे. ग्रामीण कृषि मौसम सेवा, इगतपुरी यांनी दिलेल्या हवामानाधारित सल्ल्यानुसार, उन्हाळी भुईमुग पिकाच्या शेवटच्या टप्प्यात, म्हणजे आऱ्या (गाठी) लागणे व शेंगा भरण्याच्या अवस्थेत, तुषार सिंचन केल्यास पिकाची वाढ उत्तम होते, पाण्याची बचत होते आणि उत्पादनात लक्षणीय […]
Weed control : आता मोबाईलद्वारे करा ‘स्मार्ट पद्धतीने’ तणांचा बंदोबस्त…

Weed control : शेतकरी पिकांच्या उत्पादनासाठी मेहनत घेत असताना तण नियंत्रण एक महत्त्वाचे आणि आव्हानात्मक काम असते. तणामुळे पिकांना आवश्यक असलेली सूर्यमाले, पाणी आणि पोषण मिळत नाही, ज्यामुळे पिकांचे उत्पादन कमी होऊ शकते. याशिवाय तणाच्या वाढीमुळे कीटक, रोग आणि पाणी वाया जाणे यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी योग्य उपाय […]
PF account : दिलासादायक,नोकरी बदलली? आता पीएफ खात्यासंदर्भात ही गोष्ट होणार अगदी सोपी…

PF account : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ)तर्फे नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी सुविधा जाहीर करण्यात आली आहे. आता पीएफ खातं नवीन नोकरीत गेल्यावर आपोआप तिकडे हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे वेगळा अर्ज, नियोक्त्याची स्वाक्षरी किंवा कार्यालयाची धावपळ टाळता येणार आहे. नवीन काय बदललं आहे? पूर्वी जेव्हा कर्मचारी नोकरी बदलायचा, तेव्हा पीएफ हस्तांतरणासाठी अर्ज भरावा लागायचा […]
Drip anudan : शेतकऱ्यांसाठी ठिबक आणि शेततळ्याच्या अनुदानासाठी इतक्या कोटींची तरतूद; तुम्ही लाभ घेतला का?

Drip anudan : शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा मिळावी, त्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतीवरचा अनिश्चिततेचा भार कमी व्हावा यासाठी राज्य सरकारने सन २०२५-२६ या वर्षासाठी ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना’ राबवण्यास प्रशासकीय मान्यता दिली असून, यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निर्णय २४ एप्रिल रोजीच्या शासन आदेशाने (शासन निर्णय क्रमांक: मुशाशे ०४२५/प्र.क्र.८८/१४-अे) अधिकृत करण्यात […]
Relief for Sangli Kolhapur : पूरग्रस्त सांगली-कोल्हापूरसाठी दिलासा; लघुपाटबंधारे व साठवण तलावांना गती…

Relief for Sangli Kolhapur : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी पूरप्रश्न नेहमीच डोकेदुखी ठरलेला आहे. दरवर्षी होणाऱ्या महापुरामुळे पिकांचे, जमिनींचे आणि आर्थिक नुकसान होत असते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता पूर नियंत्रणाच्या दिशेने महत्त्वाचे पावले उचलली जात आहेत. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मोठ्या धरणांच्या कॅचमेंट क्षेत्राबाहेरील लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण करण्यासह नवीन साठवण तलाव […]
Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यानंतर ५०० पर्यटक राज्यात सुखरूप पोहोचले..

Pahalgam attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर राज्य सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून, आतापर्यंत सुमारे ५०० पर्यटक सुरक्षितपणे महाराष्ट्रात परतले आहेत. इंडिगो आणि एअर इंडिया या विमान कंपन्यांच्या विशेष उड्डाणांद्वारे १८४ पर्यटक काल मुंबईत दाखल झाले. काश्मीरमध्ये अडकलेल्या उर्वरित महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी आजच्या २५ एप्रिलच्या दिवशी आणखी […]