agricultural products : राज्याच्या शेतमालाला या देशांमध्ये मिळणार निर्यातीची नवी संधी..

agricultural products

agricultural products : महाराष्ट्रातील विविधतेने नटलेली आणि दर्जेदार कृषी उत्पादने जगभरात लोकप्रिय ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरात (यूएई), व्हिएतनाम आणि सायप्रस या देशांसोबत कृषी मालाच्या निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात नुकतीच राज्याच्या पणनमंत्र्यांनी संबंधित देशांच्या प्रतिनिधींची चर्चा केली आहे. यूएई हे गल्फ कोऑपरेशन कौन्सिलमधील एक प्रमुख देश […]

Junnar agricultural irrigation : कुकडी प्रकल्पाच्या या योजनेमुळे जुन्नर तालुक्यात कृषी सिंचन वाढणार…

Junnar agricultural irrigation

Junnar agricultural irrigation : कुकडी प्रकल्पाच्या वडज उपसा सिंचन योजनेला आता प्रत्यक्ष कामाची गती मिळणार आहे. ही योजना अनेक वर्षांपासून रखडली होती, मात्र आता ३० जूनपर्यंत कामासाठी निविदा निघणार असल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तशा सूचनाच जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत. या योजनेमुळे […]

Today kanda bazarbhav : यंदा कांद्याच्या बियाणाला कशी मागणी असेल? खरीपात किती कांदा लागवड होईल?

Today kanda bazarbhav

Today kanda bazarbhav : भारतीय हवामान खात्याचा यंदाच्या मॉन्सूनचा पहिला अंदाज प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार यंदा देशात सरासरीच्या ५ टक्के जास्त म्हणजेच १०५ टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यातही कांदा पट्टा असलेल्या मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस होणार असल्याने येणाऱ्या खरीप आणि रबी कांदा लागवडीला बळ मिळण्याची शक्यता आहे. परिणामी कांदा बियाणे उत्पादकांसाठी […]

Cotton prices : कापसाचे भाव थांबले, अळीचा प्रादुर्भाव वाढला – शेतकरी अडचणीत..

Cotton prices : नुकताच देशातील यंदाचा मॉन्सून अंदाज जाहीर झाला असून त्यानुसार मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता सांगितली आहे. शेजारी असलेल्या तेलंगाणा आणि आंध्र या कपाशीच्या पट्ट्यातही यंदा चांगला पाऊस असणार आहे. त्यामुळे एकीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साह असला, तरीही दुसरीकडे गुलाबी बोंडअळीचा वाढणारा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत असून त्यांचे उत्पन्नही घटताना […]

Agricultural irrigation : राज्यातील कृषी सिंचनाला मिळणार बळकटी; जलसंपदा विभागाने घेतला असा निर्णय…

Agricultural irrigation

Agricultural irrigation : शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि पाणी हे शेतीचे सर्वात मूलभूत आणि अमूल्य घटक. परंतु गेल्या काही वर्षांत बदलत्या हवामानामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबवला जात आहे. या […]

Ladki bahin scheme : लाडक्या बहिणींना आता ५०० रुपयेच मिळणार; राज्य सरकारने घेतला असा निर्णय..

Ladki bahin scheme : राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत सरकारने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. योजनेचा उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा आर्थिक मदत करून त्यांच्या गरजा भागवण्यास हातभार लावणे. याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात होते. मात्र एप्रिल २०२५ पासून या योजनेतील काही लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम […]

farmers impact : ग्रामीण भागातील चलनवाढ दरात घट; शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार?

farmers impact

farmers impact : मार्च 2025 मध्ये देशातील ग्रामीण भागातील ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित प्रमुख चलनवाढ दर 3.25% इतका नोंदवला गेला आहे, जो फेब्रुवारी महिन्याच्या 3.79% दरापेक्षा कमी आहे. खाद्यान्न चलनवाढ दर (CFPI) देखील फेब्रुवारीतील 4.06% वरून मार्चमध्ये 2.82% इतका घटला आहे. ही घट शेती, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी ठरू […]

Mobile cooling unit : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारी मोबाईल कुलिंग युनिट काय आहे?

Mobile cooling unit : शेतमाल ताजा आणि टिकवून ठेवण्यासाठी छोटे मोबाईल कुलिंग प्रणाली अर्थातच स्टोरेज अत्यंत प्रभावी ठरत असून झारखंडमध्ये त्याचा प्रयोग उपयोगी ठरला आहे. झारखंडमधील महिलांसाठी मोबाईल कुलिंग प्रणाली एक महत्त्वपूर्ण सुधारणा ठरत आहे. या यंत्रामुळे महिलांना आपल्या शेतमालाला ताजं ठेवण्याची आणि त्याला अधिक चांगल्या किमतीला विकण्याची संधी मिळते. महिलांना शेतमाल विकताना ताजेपण टिकवून […]

Onion arrival : देशभरातील कांदा आवक वाढली; महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात आघाडीवर…

Onion arrival : देशभरात एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत कांदा आवकेमध्ये मोठी वाढ झाली आहे. एप्रिल २०२४ मध्ये देशभरातील एकूण कांदा आवक ४,७७,३९२.७० टन होती, तर यंदा एप्रिल २०२५ मध्ये ही आवक ७,१२,२५०.४४ टनांवर पोहोचली. याचा अर्थ देशभरात यंदा एप्रिल महिन्यातील कांदा आवक सुमारे २,३४,८५७.७४ टनांनी वाढली आहे. […]

Long Range Forecast : २०२५ मध्ये नैऋत्य मान्सून हंगामी पावसाचा दीर्घकालीन अंदाज..

Long Range Forecast : भारतीय हवामान विभागाने १५ एप्रिल २०२५ रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, यंदाचा २०२५ चा दक्षिण-पश्चिम मान्सूनचा पाऊस संपूर्ण देशभर सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी ठरणार आहे. जून ते सप्टेंबर या काळात देशभर सुमारे १०५ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही टक्केवारी १९७१ ते २०२० […]