आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 4 3000 4000 3500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 1600 2200 1900 पुणे-मोशी लोकल क्विंटल 14 2000 3000 2500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बाजरी अहमदनगर […]

Red Onion Price : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची आवक वाढली, लासलगावला कसा मिळाला बाजारभाव?

Red Onion Price : आज दिनांक २९ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याला (Lal Kanda) कमीत कमी १४०० रुपये, तर सरासरी ४१०० रुपये बाजारभाव मिळाला. तर लासलगाव विंचूर बाजारसमितीत लाल कांद्याला कमीत कमी २ हजार रुपये, तर सरासरी ४१०० रु. बाजारभाव मिळाला. लासलगाव बाजारात सुमारे साडेनऊ हजार क्विंटल, तर विंचूर बाजारात आज सुमारे ४ हजार […]

Garlic Price: पुणे, सोलापूरसह लसणाचा बाजार घसरला, आज काय आहेत दर….

Garlic Price : मागील तीन-चार दिवसांपासून सुमारे ४५ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचलेले लसणाचे बाजारभाव आज (दि. २९ नोव्हें) बऱ्यापैकी खाली आले असून अनेक ठिकाणी लसणाच्या बाजारभावात सुमारे १ हजार ते ४ हजार रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले पुणे बाजारसमितीत आज लसूण आवक ८२ क्विंटलने घटून आज १२१९ क्विंटल इतकी झाली. या ठिकाणी लसणाला कमीत […]

Maharashtra Weather : राज्यात या ठिकाणी पुढच्या आठवड्यात पावसाची शक्यता, काय सांगते राज्याची हवा, जाणून घ्या…

Maharashtra Weather : उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका काकयम आहे. पुण्यासह पश्चिम पट्ट्यातही थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 02 व 03 डिसेंबर रोजी मराठवाड्यात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात […]

Maharashtra CM : फडणवीस नव्हे, तर बहुजन समाजातील चेहरा भाजपा बसविणार मुख्यमंत्रीपदी? काय आहे तथ्य?

Maharashtra CM : राज्यात कोण सत्ता स्थापन करणार आणि कुणाची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागते याकडे सामान्य शेतकऱ्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे सत्तास्थापनेतील राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत असून क्षणाक्षणाला राजकीय पटावरची स्थिती बदलत आहे. दोन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरू असल्या आणि तशा बातम्याही माध्यमांनी दिल्या असल्या, तरी भारतीय […]

Tomato Farming : शेतकऱ्याने टोमॅटो लागवड केली, पण फळधारणा होताच पोलिसांची शेतात पडली धाड, त्यानंतर….

Tomato Farming : एक एकर टोमॅटोच्या शेतातून सुमारे १३ लाख रुपये कमविण्याचा विचार एका शेतकऱ्याने केला. त्या दृष्टीने त्याने वेगळेच प्रयत्न केले, पण घडले भलतेच. अखेर या शेतकऱ्याच्या आगळ्या प्रयोगाची सांगता पोलिस स्थानकात झाली. वडनेर भैरव, ता चांडवड, जि. नाशिक येथील शेतकरी रवींद्र गांगुर्डे याने यंदा टोमॅटोचे पीक घेतले. टोमॅटो जोमदार बहरले आणि रोपांना फळेही […]

Kapus Bajarbhav : यंदा कापसाची उत्पादकता वाढली, पण उत्पादन घटले, दरावर काय परिणाम होणार…

Kapus Bajarbhav : मागच्या वर्षीच्या तुलनेत भारतात यंदा म्ह्णजेच वर्ष २०२४-२५मध्ये कापसाचे उत्पादन घटले आहे. संपूर्ण देशात यंदा कापसाची हेक्टरी उत्पादकता वाढली आहे. मागील वर्षी हेक्टरी ४३५.७५ किलो कापूस उत्पादन झाले. यंदा त्यात काहीशी वाढ होऊन हेक्टरी ४४७.८४ किलो सरासरी कापूस उत्पादन देशात झाले आहे. कापूस हंगाम 2024-25 साठी कापूस उत्पादन आणि वापर समितीची (सीओसीपीसी) […]

Paste Control : एकात्मिक कीटक व्यवस्थापनासाठी या जिल्ह्यातील शेतकरी सज्ज, उत्पादन वाढविण्यावर भर देणार…

Paste Control : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या रोप संरक्षण विलगीकरण आणि साठवण महासंचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली नागपूरच्या प्रादेशिक केंद्रीय एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्राने एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM) या विषयावर महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), नागपूर, परभणी, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षणात राज्य सरकार, कृषी विज्ञान […]

Soybean Bajarbhav : सोयाबीन विकायचा की साठवायचा? असे आहेत आजचे सोयाबीन बाजारभाव..

यंदाच्या हंगामात सोयाबीनला (soybean bajarbhav) अजूनही हमीभावापेक्षा कमीच बाजारभाव मिळत आहेत. अशा वेळी अनेक शेतकरी सोयाबीनची साठवण करण्याला पसंती देत आहेत, तर काही शेतकरी सोयाबीन गोडाऊनमध्ये ठेवून त्यावर वखार महामंडळाच्या योजनेनुसार कर्ज घेत आहेत. अनेकांना अजूनही सोयाबीन विकायचा की साठवायचा याचा संभ्रम आहे. आजच्या बाजारभावातून सोयाबीनबाबत काय निर्णय घ्यायचा याचा अंदाज शेतकऱ्यांना येऊ शकतो. आज […]

Maharashtra CM : मुख्यमंत्री कोणीही झाले तरी अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद फिक्स…

Maharashtra CM : राज्याचा मुख्यमंत्री लवकरच जाहीर होणार असून येत्या दोन डिसेंबरच्या आसपास शपथविधी होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान कुणीही मुख्यमंत्री झाले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार असून सध्या ते एकप्रकारे सरकारचे किंगमेकर होताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सध्या सत्ता स्थापनेची तयारी जोरात सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री कोण होणार […]