तुम्ही डाळींब, संत्रा, आंबा बागायतदार आहात मग ही बातमी वाचाच, फायद्यात रहाल..

पुनर्रचित हवामान आधारित ‘फळ पीक विमा योजना’ आंबिया बहार सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. मात्र त्यातील काही फळपिकांच्या विम्याची मुदत ऑक्टोबरमध्येच संपली असून सध्या काही पिकांसाठी अजूनही मुदत शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमा नोंदणी करणे आवश्यक आहे. योजनेसाठी […]

बाजारभाव कमी मग शेतमाल साठवून शेकडो शेतकऱ्यांनी मिळवले कोट्यवधी रुपये..

राज्य कृषि पणन मंडळाच्या २०२३- २४ या संपणाऱ्या हंगामामध्ये राज्यातील ६७ बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेत सहभाग घेतला. त्यामध्ये सुमारे दोन लाख ७७ हजार किंटलपेक्षा जास्त शेतमाल तारणात स्वीकारला. त्यावर एकूण ३६ कोटी ३४ लाख २४ हजार रुपयांइतक्या कर्ज वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. हंगामामध्ये बाजारभाव सर्वसाधारण समाधानकारक राहिल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेत कमी […]

मजूरांच्या समस्येमुळे राज्यात यांत्रिक ऊसतोडणीकडे वाढता कल..

सध्या महाष्ट्रात ऊस गाळप हंगाम सुरू असून अनेक ठिकाणी ऊस तोडणी जोमात सुरू आहे. बहुतेक ठिकाणी ऊस तोडणी कामगारांच्या माध्यमातून ही ऊस तोडणी होत असली, तरी अलीकडच्या काळात यांत्रिक ऊसतोडणी होताना दिसत आहे. त्यात अनेक साखर कारखान्यांनी स्वत:ची ऊसतोडणी यंत्रे घेतल्याचे दिसते. सध्या राज्यात सुमारे १ हजार ऊस तोडणी यंत्राच्या माध्यमातून ऊस तोडणी सुरू असल्याचा […]

तुमच्या मोबाईलवरूनही रब्बी पीक विमा काढा, तोही एक रुपयांत, जाणून घ्या कसे ते…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीपानंतर आता रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा मिळणार असून त्यासाठी नोंदणी करण्याची शेवटची मुदत १५ डिसेंबर रोजी आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा काढलेला नाही. जवळच्या संगणक सेवा केंद्राच्या मदतीने पीक विमा भरता येईल किंवा आपल्या मोबाईलवरही अवघ्या काही मिनिटांत पीक विमा भरता येईल. मोबाईलवर पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना […]

मतदान संपले आणि सोयाबीनचे बाजारभाव पडले, जाणून घ्या आजचे बाजारभाव..

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी मतदारांना प्रभावित करण्यासाठी सरकारने अनेक घोषणा केल्या. त्यापैकीच एक होती हमीभावाने सोयाबीन खरेदी करणाऱ्या केंद्रांची. मतदानाच्या ऐन दोन दिवस आधी ही केंद्रे सुरू करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यानंतर बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वधारून ४३०० रुपयांपर्यंत गेले. मात्र आज मतदानाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी बाजारातील सोयाबीनचे भाव काहीसे गडगडल्याचे दिसून […]

सोलापूरला लाल कांद्याने ओलांडला सात हजाराचा आकडा, लासलगावला काय आहेत बाजारभाव..

kanda bajarbhav

आज दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सोलापूर बाजारसमितीत लाल कांद्याची सुमारे ३७ हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी लाल कांद्याला सरासरी अडीच हजार रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव मिळाले, कमीत कमी ५०० रुपये तर जास्तीत जास्त ७४०० रुपये बाजारभाव मिळाले. राज्यात आज लाल कांद्याला जास्तीत जास्त बाजारभाव सोलापूरमध्ये मिळाला. दरम्यान कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारात आज […]

निवडणुकीनंतर पुण्याच्या बाजारात आज भाजीपाल्याला काय दर मिळाला…

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान असल्याने बहुतेक बाजारसमित्यांमधील व्यवहारांना सुटी होती. आज सकाळी भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे बाजारसमितीसह लासलगाव-पिंपळगाव या बाजारसमित्यांचे कामकाज नियमित सुरू झाले. आज पुणे जिल्ह्यातील पिंपरी बाजारसमितीत सकाळी लोकल कांद्याला सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. कमीत कमी बाजारभाव १ हजार, तर जास्तीत जास्त ६ हजार असा […]

संपूर्ण गावाचा रासायनिक खते आणि औषधांवर खर्च शून्य; उत्पन्न मात्र झाले दुप्पट…

रासायनिक खतांच्या वापरामुळे कृषी उत्पादनावर परिणाम होण्यासह माती आणि पाणीही प्रदुषित होत आहे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कार्बनसारखे घटक कमी होऊ शेतकऱ्यांना नुकसानीचा किंवा कमी उत्पादकतेचा सामना करावा लागलो. एका गावातील शेतकऱ्यांनी मात्र हे चिञ बदलले आणि आता ते शंभर टक्के सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करत आहेत. या गावच नाव आहे हरनेड. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्हयात […]

मतदानानंतर आज पेट्रोल डिझेलचे नवीन भाव प्रसिद्ध; शेतकऱ्यांना डिझेलसाठी किती मोजावे लागणार पैसे?

दिनांक २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान सुरूळीत पार पडले. आता २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले असतानाच शेतकरी आणि सामान्य जनतेचे लक्ष मात्र इंधनाच्या दराकडे लागलेले आहे. मध्यंतरी माध्यमांतील बातम्यांनुसार निवडणुकांनंतर इंधनाचे दर वाढतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठाच फटका बसणार होता. कारण आधीच खतांसह कृषी […]

ऊस गाळप हंगाम; मतदान आटोपले, आता ऊस तोडणीला येणार वेग…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान मतदानानंतर ऊसाच्या तोडणीला वेग येणार असून गाळप हंगाम सुरळीत होणार आहे. यंदा ऊसाचा गाळप हंगाम निवडणुकीच्या मतदानानंतर सुरू करावा असा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न होता. तर साखर कारखानदारांना मात्र ऊस पळवापळवीची काळजी लागलेली होती. याचे कारण म्हणजे शेजारच्या कर्नाटक […]