बेरोजगार तरुण शेतकऱ्याची यशोगाथा, आधुनिक शेतीची आयडीया कामी आली, पाच कोटी रुपयांचे उत्पन्न निघण्याची शक्यता

लागवड करून दोन वर्षांचा अवधी झाला आहे. अद्याप याचे उत्पादन निघण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी आहे. परंतु ज्ञानेश्वरने याच चंदनात पेरूची लागवड करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. परळी : परळी तालुक्यातील कन्हेरवाडी (Parli kanherwadi) इथल्या एका बेरोजगार तरुणाने, आधुनिक शेतीची कास धरत चंदन शेतीला (chandan farming) सुरुवात केली आहे. चंदनाचं उत्पादन निघण्यास अद्याप अवधी असला तरी […]

आता हवेत फळे, भाज्या आणि मसाल्यांची होणार लागवड; जाणून घ्या काय आहे नवीन एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी?

Aeroponics technology : एरोपोनिक्स ही एक टेक्नॉलॉजी आहे, जी हवा आणि मातीशिवाय बागायती पिके वाढवण्यासाठी वापरली जाते. नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), बंगळुरू येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था (IIHR) आणि कालीकटमधील भारतीय मसाला संशोधन संस्थेने (IISR) उच्च मूल्याच्या पिकांसाठी इनडोअर एरोपोनिक्सला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. […]

पीकपेरा नोंदणीला १५पर्यंत मुदतवाढ

जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२३ अंतर्गत ई-पीकपाहणी मोहिमेअंतर्गत पिकांना पेरा नोंदविण्याचे काम सुरू आहे. यासाठी ३१ जानेवारी अंतिम मुदत होती. नांदेड : रब्बी हंगामात (Rabi sowing) शेतकऱ्यांच्या स्तरावर करण्यात येणाऱ्या पीकपेरा नोंदणीसाठी (Crop Sowing Registration) पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी (E Peek Pahani) मोहिमेअंतर्गत १५ फेब्रुवारीपर्यंत पीकपेरा नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा […]

शेतकऱ्यांसाठी ह्या वर्षी च्या बजेटमध्ये झाल्या या मोठ्या घोषणा

Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (finance minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (budget 2023) सादर केला. यात त्यांनी शेतकऱ्यांशी(farmers) संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.  देशातील शेतकऱ्यांसाठी  डिजीटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा करण्यात आली आहे.  हा  निधी आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या , शेतकऱ्यांना […]

20 गुंठ्यात मिळवले पाच लाखांचे उत्पन्न, तैवान पेरू ला पर राज्यात देखील मोठी मागणी !

सतत दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बीडच्या ग्रामीण भागातील या फळाला आता गुजरात आणि हैद्राबादच्या मार्केट मध्ये मोठी मागणी असल्याचं ऋषीकेश पुरी या शेतकऱ्याने सांगितले.   बीड : पारंपारिक शेती (Traditional farming) परवड नाही, त्यामुळे अनेक शेतकरी (Beed Farmer) वेगळा प्रयोग करुन त्यामधून चांगले पैसे कमावतात असं अनेकदा दिसून आलं आहे. मुळात पारंपारिक शेती परवत नसल्यामुळे कर्जबाजारी होण्यापेक्षा […]

सातबारा उताऱ्याला आधार कार्ड जोडणार, असा होणार शेतकऱ्यांना फायदा!

पुणे : सातबारा उताऱ्याशी खातेदार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक लिंक करण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील सहा महसूल विभागांतील एका गावात राबविण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे. त्यासाठी सहा गावांची निवड करण्यात आली असून, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका गावाची यासाठी निवड केली आहे. त्यासाठी नियमावली तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही नियमावली निश्चित झाल्यानंतर […]

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता पीक कर्ज मिळणं झालं सोपं, सिबिलची अट रद्द.

किसान : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीक कर्ज घेण्यासाठीच्या जाचक अटीतून आता शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना यापुढे बँकांना सिबिल स्कोरची अट लावता येणार नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं सोपं होणार आहे. “पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांनी ‘सिबिल’ अथवा ‘सिबिल स्कोअर’चे बंधन घालू नये. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशात त्यासंबंधीचे कोणतेही निर्बंध नाहीत. […]

<em>शेतकऱ्यांनो म्हशींच्या या जाती आहेत  दुधासाठी फायदेशीर, जाणून घ्या..</em>

  आपल्या देशातील विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पशुपालन हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. पशुपालन हा शेतीचा एक भाग आहे. यामध्ये म्हैस, गाय, शेळी, मेंढी, बैल, डुक्कर आणि कुक्कुटपालन इत्यादींचा समावेश होतो. आज आपण म्हशीच्या शेतीबद्दल बोलणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत की म्हशीच्या कोणत्या प्रगत जाती आहेत ज्यातून पाळणा–याला चांगला नफा मिळू शकतो.   म्हैस […]

रोपवाटिका व शेती व्यवसायात मिळविले थक्क करणारे यश

रोपवाटिका व शेती व्यवसायात मिळविले थक्क करणारे यश  :  श्रीमती सरला रमेश मोहिते , रा  मानोली ,ता . मंगरूळपीर ,जि वाशिम  कधीकाळी चुल आणि मुल असे  मर्यादीत विश्व असलेल्या महिलांनी नजीकच्या काळात ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानासोबतच शेती पुरक व्यवसायातही आपल्या कर्तुत्वाचे अटकेपार झेंडे रोवले आहेत  अशाच कर्तुत्वान महिलांचा आदर्श जानणान्या पैकी एक आहेत वाशिम जिल्ह्मातील मंगरूळपीर […]

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता एकाच अर्जावर मिळणार ट्रॅक्टर, शेततळे, विहिर, पॉलीहाऊस इत्यादी  १४ योजना.

शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकूण 14 योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर मिळणार आहे. कृषी योजनांचा DBT मध्ये समावेश असल्याने प्रत्येक योजनेसाठी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज नाही. भरलेल्या अर्जात शेतकरी DBT पोर्टलवर पुन्हा बदल करून इतर योजनांचाही लाभ घेऊ शकतात.  या योजनांचा आता शेतकऱ्यांना लाभ होणार […]