Banana Research Center : सोलापूर जिल्ह्यात उभारणार केळी संशोधन केंद्र..

Banana Research Center : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत मागणी असून, राज्य शासन या मागणीबाबत सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा करून लवकरच केंद्र सरकारकडे यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत दिली. सध्या राज्यात जळगाव आणि नांदेड जिल्ह्यांत केळी संशोधन […]

HTBT seeds : अनधिकृत ‘एच टी बी टी’ बियाणे विक्रीस राज्यात परवाना नाही..

HTBT seeds : शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल, यात कृषी विभागास तपासणीसाठी अधिकार देण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकार कमी केल्याबाबत चर्चेत उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. विधान परिषदेत सदस्य […]

Rain warning : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनी अशी घ्यावी काळजी..

Rain warning : भारतीय हवामान विभागाने (IMD) ९ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पीक आणि जनावरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाय करणे गरजेचे आहे. राज्यातील पावसाचा अंदाज:९ जुलैपासून विदर्भात अनेक भागांत जोरदार […]

soyabin bajarbhav : जुलै महिन्यात सोयाबीन ५ हजाराच्या पुढे जाणार का? जाणून घ्या..

Soyabin bajarbhav : सोयाबीन हे देशातील एक अत्यंत महत्त्वाचे तेलबिय पीक असून, सध्या त्याच्या दरात स्थैर्य नसल्याचे ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या जून २०२५ अहवालातून स्पष्ट होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीन उत्पादनात काहीशी घट झाली असली, तरी भारतात मात्र साठा मुबलक आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील दरांवर मोठा दबाव राहण्याची शक्यता आहे. यावर्षी भारतात सोयाबीन उत्पादन १२५ लाख टनांवर गेल्याचा […]

Gram price : हरभऱ्याच्या दरात स्थैर्य, पण एमएसपीपेक्षा खाली राहण्याची शक्यता..

Gram price : हरभरा हे भारतातील प्रमुख रब्बी पीक असून, यंदा देशात हरभऱ्याचे उत्पादन तुलनेत जास्त झाले आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांमध्ये हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या अहवालानुसार सध्याच्या स्थितीत देशात पुरेसा साठा असून त्याचा परिणाम दरांवर होत आहे. सरकारकडून अन्नसुरक्षा योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करण्यात आली असली तरीही […]

corn prices : मका दरात वाढीची शक्यता; कसे असतील जुलैचे भाव…

corn prices : यंदा देशातील मका उत्पादनात घट झाल्यामुळे जुलै महिन्यात मक्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सन २०२४-२५ या हंगामात भारतातील मका उत्पादनात सुमारे ६ टक्क्यांची घट झाली आहे. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक व राजस्थान यांसारख्या प्रमुख मकाउत्पादक राज्यांमध्ये […]

Onion market price : कांदा बाजारभावासाठी दिलासादायक; सरकारी कांदा खरेदी दुप्पट होणार?

onion market price  : सध्या कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणावर घसरले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जर सरकारने थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीच्या माध्यमातून कांदा खरेदी केली आणि खरेदीचे प्रमाण दुप्पट केले, तर शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळेल, असे स्पष्ट करत राज्य सरकारने केंद्राकडे महत्त्वाची मागणी केली आहे. राज्याचे कृषी मंत्री […]

Antyodaya Grain Scheme : अंत्योदय धान्य योजनेचा ग्रामीण भागासह १०लाख कुटुंबांना लाभ..

Antyodaya Grain Scheme : राज्यात प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ झाला असून प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत सध्या १,८६,०१३ शिधापत्रिकांवर ७,७७,४५७ लाभार्थी आहेत, तर अंत्योदय अन्न योजनेत ६६,७३४ शिधापत्रिकांवर २,४८,९१६ लाभार्थी लाभ घेत असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत […]

Employment opportunities : शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार संधी; राज्यात लवकरच सरकारी मेगा भरती ..

Employment opportunities : राज्यात शेतकरी कुटुंबातील मुले आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी येणार आहे. राज्य शासन लवकरच विविध शासकीय विभागांतील रिक्त पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या काळात प्रत्येक विभागाने रिक्त पदांची माहिती […]

Monsoon session : कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राला चालना देणाऱ्या पुरवणी मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर..

Monsoon session : राज्याच्या अर्थसंकल्प २०२५-२६ मधील गृह, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय या महत्त्वाच्या विभागांच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत चर्चा होऊन त्या मंजूर करण्यात आल्या. शेतकरी, पशुपालक आणि दुग्धव्यवसायिकांसाठी दिलासा देणाऱ्या या निर्णयांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या मागण्यांवर चर्चा करताना कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी […]