Monsoon session : कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राला चालना देणाऱ्या पुरवणी मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर..

Monsoon session : राज्याच्या अर्थसंकल्प २०२५-२६ मधील गृह, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय या महत्त्वाच्या विभागांच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत चर्चा होऊन त्या मंजूर करण्यात आल्या. शेतकरी, पशुपालक आणि दुग्धव्यवसायिकांसाठी दिलासा देणाऱ्या या निर्णयांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या मागण्यांवर चर्चा करताना कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी […]
Nccf kanda kharedi: मोठी बातमी, नाफेडनंतर आता एनसीसीएफमार्फत कांदा खरेदीस सुरुवात..

nccf kanda kharedi: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे एनसीसीएफ अर्थात नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेने आता थेट शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदीला सुरुवात केली आहे. याआधी नाफेडकडून १२ सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू झाली होती. आता ७ जुलैपासून एनसीसीएफची खरेदी २७ एफपीओंच्या (शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या) माध्यमातून सुरू […]
Kanda market कांदा बाजारभाव आज पिंपळगाव बसवंत येथे किती घसरले?

kanda market : महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMC) आज, 7 जुलै 2025 रोजी कांद्याला ( kanda market) विविध दर मिळाले. आजच्या आकडेवारीनुसार, राज्याचा सरासरी कांदा बाजारभाव रुपये 1445 प्रति क्विंटल राहिला. प्रमुख बाजारपेठांचे दर:पिंपळगाव बसवंत बाजार समिती:* आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक झाली, जी 14400 क्विंटल नोंदवली गेली.* येथे किमान […]
Tur cultivation advice : तूर पिकावर मर रोगाची शक्यता; तातडीने उचला ही पावले..

Tur cultivation advice : जास्त पावसामुळे तुर पिकांमध्ये जमिनीत पाणी साचल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तुर हे पीक पावसास अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्यामध्ये मुळे सडण्याचा धोका वाढतो. मर रोगाच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम पाणी शेताबाहेर निचरा करावा. रोगग्रस्त झाडे काढून टाकावीत. त्याठिकाणी आणि चारही बाजूंनी १ मीटर अंतरावर कार्बेडेंझीम २५ ग्रॅम प्रति […]
Cotton fields : जास्त पावसामुळे कापसाच्या शेतात मुळे कुजण्याचा धोका..

Cotton fields : राज्यातील अनेक भागात जास्त पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने कपाशी पिकावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी आकस्मिक मर आणि मूळकूज रोगाची लक्षणे दिसून येत असून पिकांच्या उत्पादनक्षमतेवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी वेळीच पीक व्यवस्थापन उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ. […]
Soybean crop : जास्त पावसामुळे सोयाबीन पिकावर परिणाम; हा उपाय त्वरित करा..

soybean crop : मागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये जास्त पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः सततच्या ढगाळ हवामानामुळे आणि शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे पिकांच्या मुळाद्वारे अन्नद्रव्य शोषण क्रिया मंदावली आहे. यामुळे सोयाबीनच्या वाढीवर व उत्पादनक्षमतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कृषि […]
Ujni Dam : राज्यातील अनेक धरणे 100 टक्के भरली; उजनीची वाटचाल शंभरीकडे…

Ujni Dam : राज्यातील अनेक धरणे १०० टक्के भरली असून, काही धरणांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. ही माहिती १ जून २०२५ पासून संकलित करण्यात आली आहे. १०० टक्के भरलेली धरणे:राज्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे की, काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील आढळा धरण (१००.००%) आणि भोजापूर धरण (१००.००%) […]
Rain warning : मॉन्सूनने वेग घेतला, राज्यात जोरदार पावसाचा इशारा…

Rain warning : महाराष्ट्रात मॉन्सूनने आता चांगलाच जोर धरला असून, येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात तसेच कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्याच्या भागात मुसळधार सरींची शक्यता असून काही ठिकाणी पूरजन्य स्थिती उद्भवण्याचा धोका नाकारता येत नाही. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे […]
Orange growers : दिलासादायक फायटोप्थोरा नुकसानग्रस्त संत्रा उत्पादकांना शासकीय मदत..

Orange growers : विदर्भात अमरावती आणि नागपूर विभागात संत्रा फळपिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. संत्रा फळ पिकावर दरवर्षी बुरशीजन्य फायटोप्थोरा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. हा प्रादुर्भाव पाच टक्क्यांच्या आतमध्ये आहे. या रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन नुकसान झाल्याचे आढळून आल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येईल, असे कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या […]
Wind energy company : पवन ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत शासन ॲक्शन मोडवर..

Wind energy company : धाराशिव जिल्ह्यात २२ पवन ऊर्जा कंपन्यांकडून ८४३ पवनस्तंभाचे काम सुरू आहे. या कंपन्यांकडून स्थानिक शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणाची पोलिस महानिरीक्षक यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे कृषी राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानसभेत सांगितले. तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांना कंपन्यांकडून मारहाण प्रकरणावर विधानसभा सदस्य कैलास […]