kanda bajarbhav : आठवड्याच्या शेवटी उन्हाळी कांद्याला कसा बाजारभाव मिळाला ?

kanda bhazarbhav

kanda bhazarbhav : आज दिनांक 3 मे 2025 रोजी म्हणजेच आठवडष्याच्या शेवटी दुपारी ४ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची एकूण 92 हजार 344 क्विंटल तर लाल कांद्याची एकूण 7 हजार 239 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये उन्हाळी कांद्याला सरासरी 980 रुपयांचा दर मिळाला, तर लाल कांद्याला सरासरी 772 रुपयांचा दर मिळाला. राज्यात सर्वाधिक […]

Natural farming: ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीसाठी घेतला पुढाकार; पहा सविस्तर…

Natural farming

Natural farming : राज्यभरात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील सुमारे २ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती  (Natural farming) केली जाणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्माच्या वतीने कृषी विभागाने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अशी माहिती देण्यात आली. जालना जिल्ह्यातील २७०० […]

Sugar industry : केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी नवे धोरण; नव्या बदलांचा शेतकऱ्यांना काय होणार फायदा वाचा सविस्तर…

Sugar industry : यापूर्वी १९६६ मध्ये तयार करण्यात आलेला साखर नियंत्रण आदेश लागू होता. साखर उद्योगासाठी असलेल्या जुन्या आणि कालबाह्य नियमांचा केंद्र सरकारने आढावा घेत, आता साखर (नियंत्रण) आदेश २०२५ चा मसुदा तयार केला आहे. परंतु , उद्योगातील तंत्रज्ञानातील प्रगती व बदलती स्थिती लक्षात घेता नवीन नियामक चौकट तयार करण्याची आवश्यकता होती. या नव्या आदेशाचा […]

Nafed kanda scam : नाफेड कांदा घोटाळ्यात गोवा फेडरेशनच्या एमडीवर कारवाई…

Nafed kanda scam

Nafed kanda scam : गोवा राज्य सहकारी मार्केटिंग आणि सप्लाय फेडरेशनमध्ये सुमारे ५.५ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आले आहे. हा घोटाळा केंद्र शासनाच्या नाफेड (NAFED) संस्थेशी संबंधित आहे. नाफेडने गोवा फेडरेशनला अनुदानित दराने कांदा पुरवला होता, जो स्थानिक बाजारात कमी दराने विकण्याचा हेतू होता. मात्र, या कांद्याचा […]

Jaggery industry : गुऱ्हाळांवर केंद्र सरकारचे नवीन बंधन; कोल्हापूर सांगलीच्या गुळ उद्योगावर होणार परिणाम?

Jaggery industry : महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या गुऱ्हाळ उद्योगाला आता केंद्र सरकारच्या नव्या नियमनाचा सामना करावा लागणार आहे. केंद्र सरकारने 1966 च्या साखर नियंत्रण आदेशात सुधारणा करत गुळ व खांडसारी उद्योगांनाही नियंत्रणाच्या चौकटीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः दररोज 500 टन किंवा त्याहून अधिक ऊस गाळप करणाऱ्या गुऱ्हाळांवर हे बंधन लागू होणार असून, त्यांना आता […]

Nafed kanda prices : मोठी बातमी: नाफेडची खरेदी रखडणार? कांदा बाजार भाव आणखी घसरणार?

Nafed kanda prices

Nafed kanda prices : यंदा मे महिन्यात नाफेड आणि एनसीसीएफची सरकारी कांदा खरेदी सुरू होणार अशी शक्यता वर्तविली जात होती. नाफेडच्या सूत्रांनीही ही शक्यता व्यक्त केली होती. मात्र ताज्या माहितीनुसार आता ही खरेदी लांबण्याची किंवा रखडण्याची शक्यता असून त्याचा परिणाम सध्याच्या कांदा बाजारभावावर होणार आहे. परिणामी आधीच दबावात असलेले बाजारभाव खरेदी सुरू झाली नाही, तर […]

Export of grapes : यंदा भारतीय द्राक्षांची निर्यात घटली; हवामानाचाही फटका…

Export of grapes : सध्या भारतातून युरोपियन युनियन (EU) कडे होणाऱ्या द्राक्ष (Table Grapes) निर्यातीला मोठा फटका बसलेला आहे. मागील आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार, या हंगामात निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत निम्म्यावर आली आहे. ही आकडेवारी २०१४-१५ नंतरची सर्वात कमी आहे, असे आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विश्लेषक अ‍ॅडम फॉर्मिका यांनी सांगितले आहे. या घसरणीमागे शेतातील हवामान बदल आणि बाजारातील […]

Unseasonal rain : महाराष्ट्रात वीजांसह अवकाळी पावसाचा अंदाज, कुठल्या भागात पडणार…

Unseasonal rain : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह वीजांच्या कडकडाटात पाऊस होणार आहे. विदर्भात ३ आणि ४ मे रोजी वाऱ्याचा वेग ताशी ५०–६० किमीपर्यंत पोहोचू शकतो. तापमानाच्या दृष्टीने पाहता, महाराष्ट्रातील […]

Bhendwl’s prophecy : भेंडवळच्या भविष्यवाणीत यंदा जून कमी पावसाचा? कुठल्या पिकांत येणार तेजी? जाणून घ्या…

Bhendwl’s prophecy : बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दरवर्षी चर्चेत येते. कारण येथे गेल्या अनेक पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीने हवामान, पावसाचे प्रमाण आणि शेतीविषयक अंदाज वर्तवले जातात. याला “भेंडवळ भविष्य” असे म्हटले जाते. विज्ञानाच्या आधुनिक युगातही या भविष्यवाणीवर अनेक शेतकरी विश्वास ठेवतात. यंदाही गुरुवारी ही भविष्यवाणी जाहीर झाली असून, राज्यातील शेतकऱ्यांमध्ये […]

Crop insurance : निवडणूक झाली अन्‌ एक रुपयात पीक विम्याची गरजही संपली..

Crop insurance : महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये सुरू केलेली ‘एक रुपयात पीक विमा योजना’ येत्या खरीप हंगामापासून गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना अतिशय अल्प खर्चात म्हणजे केवळ एका रुपयात पीक विम्याचे संरक्षण देणारी ही योजना जरी लोकप्रिय ठरली असली, तरी तिच्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने योजनेला तात्पुरती विश्रांती देऊन नव्या […]