Sugarcane cultivation : सुरू ऊसाची लागवड अजून झालेली नाही? मग या टिप्स वाचाच..

अजूनही अनेक शेतकऱ्यांचे सुरू ऊसाच्या लागवडीचे नियोजन सुरू आहे. सुरू ऊसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. सुरु ऊस लागवड करण्यासाठी को. ८६०३२ (नीरा), को.एम्.०२६५ (फुले २६५), एम.एस.१०००१ (फुले १०००१), को.९४०१२ (फुले सावित्री), को.सी.६७१ (वसंत-१) या जातींची निवड करावी. सुरू उसामध्ये उन्हाळी भुईमूग, कांदा, काकडी, टरबूज, कलिंगड, इत्यादी पिके आंतरपीक म्हणून घेता येतात. […]

rabi maize:रब्बी मक्यावरील लष्करी अळीचे असे करा नियंत्रण

rabi maize

rabi maize:रब्बी मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचे एकात्मिक पदधतीने नियंत्रण करावे. भौतिक नियंत्रण करताना शक्य असल्यास अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. तसेच किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यामध्ये वाळू टाकावी, असे केल्याने अळीला वाढीच्या भागातील खाण्यापासून परावृत्त करता येईल, शेंडा तुटणार नाही. जैविक नियंत्रण: अंड्यांवर उपजीविका करण्याऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची एकरी ५०,००० अंडी दहा […]

halad salla: हळदीचे जोरदार उत्पादन पाहिजे? मग काढणीच्या वेळी या गोष्टी कराच

halad salla: जमिनीच्या पोताप्रमाणे माळरानाच्या हलक्या जमिनीमध्ये हळद पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ८० ते ९० टक्के पाने वाळलेली असतात. तर मध्यम व भारी जमिनीमध्ये ६० ते ७० टक्के पाने वाळलेली असतात. हे हळद पीक परिपक्वतेचे मुख्य लक्षण मानले जाते. हळदीच्या काढणीअगोदर १५ ते ३० दिवस पिकास पाणी देणे बंद करावे. एकदम पाणी देणे बंद करू […]

kanda bajarbhav : या बाजारात कांद्याने खाल्ला सर्वाधिक भाव; जाणून घ्या…

kanda bajarbhav: मंगळवार दिनांक २९ जानेवारी रोजी राज्यात सोमवारच्या तुलनेत आवकेत साधारणत: १ लाख क्विंटलने घट झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे काही बाजारात कमाल दर वाढलेले दिसून आले. काल राज्यात एकूण १ लाख ९० हजार क्विंटल आवक झाली. नाशिक जिल्ह्यातही आवक घटलेली दिसली. नाशिक जिल्ह्यात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी अंदाजे ९५ हजार क्विंटल आवक पाहायला मिळाली. दरम्यान […]

onion damage : खताच्या लिंकींगमुळे नाशिकला १०० एकर कांद्याचे नुकसान; कृषी मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय*

 onion damage : नाशिकच्या कळवणसह चांदवड आणि सिन्नर तालुक्यात गव्हावर वापरले जाणारे तणनाशक फवारल्याने १००हून अधिक एकरवरील कांदा भुईसपाट झाला. असेच प्रकरण देवळा तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडले होते. कृषी सेवा केंद्राने कंपन्यांच्या लिंकींगच्या दबावातून औषध शेतकऱ्यांच्या गळ्यात मारले असा आरोप होताना दिसत आहे. मात्र या संदर्भात राज्याच्या कृषी मंत्र्यांनी कृषी निविष्ठा पुरवठादारांच्या बैठकीत मोठी घोषणा […]

dhananjay munde : मंत्री मुंडेंवर राजीनाम्याचे सावट; दिल्ली निवडणुकीनंतर होणार फैसला..

dhananjay munde: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण हत्या झाल्यानंतर त्या हत्येशी संबंधित वाल्मिक कराड आणि इतरांना मकोका आणि खूनाच्या कलमाखाली अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा असून या खूनात त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मागील दोन दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी […]

kanda sheti: हा एकच उपाय आणि कांद्यावरील रोगाचा नायनाट; जाणून घ्या..

kanda sheti:महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात कांदा पिकाचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. कांदा बीजोत्पादनासाठी अशी घ्या काळजी: पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी. नत्र खताचा पहिला हप्ता १२ किलो प्रति एकर या प्रमाणात लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. नत्र खताचा दुसरा हप्ता १२ किलो प्रति एकर या प्रमाणात […]

Tur bajarbhav: तूरीच्या किंमती हमीभावापेक्षा खाली; नंतर वधारणार का?

tur bajarbhav: आज सकाळी वरूड बाजारात लाल तुरीला कमीत कमी ६२०० आणि सरासरी ६५८३ रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळाले. दरम्यान मंगळवारी राज्यात तुरीला सरासरी ६७०० रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळाले. दोंडाईचा, जि. धुळे बाजारात तुरीला किमान ५ हजार आणि सरासरी ६१०० रुपये बाजारभाव मिळाले, शहाद्यात सरासरी ६२२५ रुपये बाजारभाव होते. पैठण बाजारात तुरीला ६७०० रुपये बाजारभाव […]

halad bajarbhav : हळदीच्या बाजाराला झळाली येणार; या सप्ताहात असा होता बाजार…

सोमवारी आठवड्याच्या सुरूवातीला सांगली बाजारात हळदीला सरासरी १३ हजार ८२५ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. हिंगोली बाजारात सरासरी १२ हजार ६५०, नांदेड बाजारात १३ हजार तर बसमत बाजारात १२ हजार ३५५ रु प्रति क्विंटल बाजारभाव होते. मंगळवारी मुंबई बाजारात हळदीचे दर २० हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. दरम्यान मागील आठवड्यात हिंगोली बाजारात हळदीची किंमत […]

Maize market : या सप्ताहात मका बाजारात कशी उलाढाल झाली?

maize prices: आज मुंबईत मक्याला सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला, तर काल सिल्लोड बाजारात मक्याला सरासरी २१५० रुपये बाजारभाव मिळाला. दरम्यान सोमवारपासून सुरू झालेल्या या आठवड्यात मक्याचे बाजारभाव तुलनेने स्थिर आहेत. मागील आठवड्यात नांदगाव बाजारात मक्याची किंमत रु. २२५० प्रती क्विंटल होती. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यात किंमती समान आहे. खरीप हंगाम २०२४-२५ साठी […]